रांची येथिल भरकटलेल्या महिलेची कुटुंबीयांसोबत होणार भेट ;निंभोरा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रांची येथील जगन्नाथपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बिरसा चौक प्रकाश नगरमधील रहिवाशी संपत देवी वय अंदाजित वय 50 ते 55ही महिला दिनांक 07/03/2023पासुन बेपत्ता झाली होती त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेही मिळुन न आल्याने तिचे पती नामे धनंजय कुमार याने जगन्नाथपुर पोलीस स्टेशनला त्याची पत्नी नामे संपत देवी ही बेपत्ता झाली असल्याची तक्रार नोंद केली होती. [ads id="ads1"]  

  तसेच या महिलेचा शोध घेण्यासाठी स्थानिक वृत्तपत्रात हरवल्याची वृत्त प्रसारित करून सादर वर्णनाची महिला मिळून आल्यास कळविण्याचे आवाहन करण्यात आले दिनांक 12/03/2023रोजी निंभोरा पोलीस स्टेशनच्या परिसरात रेल्वे क्वार्टर जवळ एक अनोळखी महिला फिरत असल्याचे दिसुन आले असता त्या रेल्वे क्वार्टर परिसरातील रहिवाशी संध्या मंगेश तायडे आणि शकुंतला नितीन तायडे यांनी या अनोळखी महिलेला पोलीस स्टेशनला आणले असता निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ पोलीस नाईक सुरेश अढायगे यांनी या अनोळखी महिलेची आस्थेवाईकपणे विचारपूस केली तरीही हि अनोळखी महिला घाबरलेली असल्याने तिने कुठलीही माहिती दिली  नाही.[ads id="ads2"]  

   त्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ व सुरेश अढायगे यांनी खाकितील माणुसकीचे भावनेतून जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वेले येथिल मानव विकास सेवा तिर्थचे व्यवस्थापक पाटील यांच्याशी संपर्क साधून अनोळखी महिलेची माहिती सांगून मानव सेवा तिर्थ येथे दाखल करून घेण्यासाठी विनंती केली व लागलीच सरकारी गाडीने या अनोळखी महिलेस पोलीस नाईक सुरेश अढागे व होमगार्ड कर्मचारी यांनी वेले तालुका चोपडा येथिल मानव सेवा तीर्थ येथे दिनांक 13/03/2023 रोजी दाखल करण्यात आले आहे. या अनोळखी महिलेची सखोल चौकशी केली असता ही महिला रांची झारखंड येथिल जगन्नाथपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवाशी असून संपतदेवी धनंजय कुमार असे या अनोळखी महिलेचे नाव असून सदर महिला ही महिला आठ दहा दिवसांपासून बेपत्ता असल्याने तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते.

हेही वाचा:- भुसावळ तालुक्यातील वरणगाव जवळ एसटीच्या धडकेत तीन जण तरुण ठार

हेही वाचा :- एका महिलेची हत्या करुन गोणपाटात मृतदेह टाकून फेकून दिल्याची घटना उघडकीस ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

 त्याच्या कुटुंबातील सदस्यांसोबत बोलणे झाल्याने तिचे कुटुंबीय लवकरच या महिला घेण्यासाठी येणार असून सदर महिलेला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहेत तसेच निंभोरा पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!