रावेर येथे शुक्रवारी राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचे कीर्तन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा ) येथील साईबाबा मंदिर ९ वा वर्धापन दिन व रामनवमी उत्सवाच्या पर्वावर राष्ट्रीय कीर्तनकार,प्रबोधनकार व सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे जाहीर शुक्रवार दि.२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे.[ads id="ads1"]  

       येथील सावदा रोडवरील अष्टविनायक नगरातील साईबाबा मंदिराचा ९ वा वर्धापन दिन व रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय कीर्तनकार,खंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे जाहीर कीर्तन दि.२४ मार्च शुक्रवारी सायं.७ वा.साईबाबा मंदिर अष्टविनायक नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.[ads id="ads2"]  

  तसेच दि.३० मार्च गुरुवारी रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केले आहे.तर सर्व भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन साईबाबा मंदिर समितीकडून व अष्टविनायक नगर वासियांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!