ग्रामीण भागातील खोलवर रुजलेले हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित ठेऊ या : म.रा.कॉ. क. सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनवणे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



साक्री,धुळे(अकील सादिक शहा) : केंद्रातील व आपल्या राज्यातील धर्मांध सरकारे हिंदू मुस्लिम ऐक्यास बाधा आणण्याच्या प्रयत्नांत असून देशात व राज्यात या दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भविष्यात देशात दंगली पेटवून पुन्हा सत्तेत येण्याचे त्यांचे प्रयत्न असून त्या साठी ते कामाला लागले आहेत. त्यांचे ते प्रयत्न आपण हाणून पाडू या . या साठी ग्रामीण भागातील हिंदू- मुस्लिम बांधवांच्या ऐक्याला तडा जाऊ देऊ नका असे आवाहन प्रा. प्रकाश सोनवणे यांनी आपल्या शेवाळी(दा) गावात "इफ्तारी" निमित्त जमलेल्या मुस्लिम बांधावास केले.[ads id="ads1"]  

शेवाळी, ता. साक्री,जिल्हा धुळे येथे स्थानिक मुस्लिम बांधवांच्या आयोजित इफ्तार पार्टीस भूमीपुत्र प्रा.प्रकाश सोनवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जमलेल्या मुस्लिम व हिंदू बांधवांना त्यांनी रमजान महिन्याचे महत्व विषद केले.  मार्गदर्शन करताना ते म्हणालेत की " मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे त्यांची प्रगती खुंटली आहे. याची नोंद "सच्चर कमिटीने " नोंदविली आहे.  काँग्रेस पक्ष सत्तेत असताना मुस्लिम समाजाची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगती साठी अनेक योजना आणल्या व त्या राबवल्यात. मात्र आताचे केंद्रातील जातीयवादी सरकार हे काँग्रस काळातील सर्व सवलती बंद करीत आहे व मुस्लिम समाजास आर्थिक संकटात ढकलत आहे. या साठी आपण सर्वांनी जागृत राहून त्यांचे हे दुष्ट मनसुबे हाणून पाडले पाहिजे. या साठी शिक्षण हे फार महत्वाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यालाही इतरानप्रमाने समान अधिकार दिलेले आहेत. [ads id="ads2"]  

   " शिकू या व प्रगती करू या " असे मार्गदर्शन त्यांनी केले. सध्या देशात व आपल्या राज्यात अराजकतेचे वातावरण असून हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ द्यायचा नसेल तर आपले ऐक्य असेच अबाधित ठेवा असेही आवाहन त्यांनी जमलेल्या हिंदू मुस्लिम बांधवांना केले. 

 या वेळी साक्री प.स.साक्री माजी उपसभापती श्री. नितीन साळुंके, शेवाळी चे माजी सरपंच तथा साक्री तालुका कांग्रेस कमेटी कार्याध्यक्ष मा. दिपक साळुंके, माध्यमिक विद्यालय तामसवाडीचे मा. मुख्याध्यापक मा.आबासाहेब निंबा साळुंके, माजी सरपंच दगाजी साळुंके , माजी उपसरपंच मा.बंडू नांद्रे , मुस्लिम बांधव प्रामुख्याने माजी ग्राम पंचायत सदस्य सादिक(शकील दादा)शहा, मूसा शहा, रशीद शहा, फिरोज शहा, हाजी इब्राहिम पिंजारी, जुबेर मंसूरी, मकसूद शहा, फरीद पिंजारी, पत्रकार अकील शहा आदि उपस्थित होते व तसेच मुस्लिम समाजातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होतें.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!