सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा पोलीस स्टेशन हदीत व परीसरात गेल्या काही दिवसात मोटार सायकल चोरीचे प्रमाणात वाढ झाल्याने पोलीसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहीले होते त्यामुळे मोटार सायकल चोरांचा शोध घेण्याच्या दृष्टीने सावदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री जालींदर पळे यांनी एम राजकुमार,पोलीस अधिक्षक,चंद्रकांत गवळी,अप्पर पोलीस अधिक्षक जळगाव, प्रताप शिकारे उप विभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे पोउपनि श्री विनोद खांडबहाले यांचे सोबत चोरट्यांचा शोध घेणेकामी एक पथक तयार केले. [ads id="ads1"]
व त्यांना सावदा पोलीस स्टेशन परीसरातील गर्दीची ठिकाणे मंगल कार्यालये, अशा ठिकाणी पाळत ठेवणे तसेच अचानक प्रभावी नाकाबंदी राबविणे बाबत आदेशीत केले. त्यानुसार पोउपनि श्री विनोद खांडबहाले यांचे सोबत पोहेकॉ उमेश पाटील, विनोद पाटील, संजीव चौधरी, पोना.मोहसीनखान पठाण, यशवंत टाकळे,विनोद तडवी, पोकों.मनोज तडवी,चालक पोको.नामदेव कापडे हे नाकाबंदी करीत असतांना त्यांना एक इसम नामे जावेद मुबारक तडवी रा. पातोंडा,ता.जि.बुरहानपुर हा विनानंवर चीमोटार सायकल चालवत घेवुन येत असतांना मिळून आला त्यास सदर मोटार सायकलच्या कागदपत्र्यांची मागणी केली असता त्याने -उडवाउडवीची उत्तरे दिल्याने असल्याने त्यास अधिक चौकशी कामी पोलीस स्टेशन येथे आणुन त्याची व गाडीची चौकशी केली असता सदरची मोटार सायकल ही सावदा पोलीस स्टेशन सी.सी.टी.एन.एस. गु.र.नं. ३९/२०२३ भादवि ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली मो.सा. असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करून अधिक चौकशी केली असता त्याने सदरची मोटार सायकल चोरीकेलेली असल्याची कबुली पोलीसांना दिली आहे. [ads id="ads2"]
त्याचप्रमाणे त्याने त्याचा साथीदार नामे मुनाफ मुबारक तडवी रा.कोळवद ता.यावल याचे साथीने सावदा रावेर,चोपडा,नेरी, ता.जामनेर,लालबाग ता.जि. बुरहानपुर,गणपतीनाका बुरहानपुर मध्यप्रदेश येथुन देखील मोटार सायकलींची चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने त्याचा साथीदार नामे मुनाफ मुबारक तडवी रा.कोळवद,ता. यावल यास देखील सावदा पोलीस स्टेशन सी.सी.टी.एन. एस. गु.र.नं. २३ / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनी आतापर्यंत एकूण १२ मोटार सायकलींची चोरी केल्याची कबुली दिल्याने आरोपी कडुन चोरी करण्यात आलेल्या मोटार सायकली पैकी वाघझिरा,ता. यावल येथून ०८,कोळवद ता. यावल येथून ०२,पाल घाट येथुन ०१ व नाकाबंदी दरम्यान ०१ अशा एकुण १२ मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.
हेही वाचा :- RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला सुरुवात ; पहिली ते आठवीपर्यंत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ; फॉर्म भरण्यासाठी "हे" कागदपत्रे लागणार
सदर वरील मोटार सायकल चोरीबाबत सावदा पोलीस स्टेशन येथील ०२ गुन्हे, रावेर पोलीस स्टेशन येथील ०१ गुन्हा,चोपडा ग्रामीण येथील ०१ गुन्हा,जामनेर पोलीस स्टेशन येथील ०१ गुन्हा, तसेच मध्य प्रदेश मधील बुरहानपुर शहरातील गणपतीनाका पोलीस स्टेशन येथील ०१ गुन्हा, लालबाग पोलीस स्टेशन येथील ०१ गुन्हा, तसेच निंबोला पोलीस स्टेशन येथील ०१ गुन्हा उघडकिस आले असुन इतर मोटार सायकलीच्यामुळ मालकांचा शोध घेवुन अधिक गुन्हे आणण्यासाठी प्रयत्न सावदा पोलीसांमार्फत चालु असुन सदर बाबत पुढील तपास सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि विनोद खांडबहाले यांचे सोबत पोहेकॉ उमेश पाटील, संजीव चौधरी,पोना/मोहसीन खान पठाण,विनोद तडवी व सहकारी करीत आहे.