प्रत्येक अपयश आपनाला काहीतरी शिकऊन जात असतं, आपणाला फक्त त्यातून शिकावे लागेल आणि पुढे जावे लागेल , जीवनातील हा एकमेव मार्ग आहे. जो आपणाला काहीतरी सांगत असतो. अन्यथा, आपण एका झोनमध्ये अडकून पडतो आणि त्यातून बाहेर पडणे कठीण जाते.
आपले विचार हेच आपणाला चांगले दिवस आणतात किंवा वाईट दिवस आणतात हे आपल्या विचाराद्वारे ठरविले जाते. म्हणून विचार करणे खूप गरजेचे आहे की, आपण विचार कसे करतो ? मी जर आपणाला विचारलं की आपण कसे आहात ? तर आपण सांगणार माझ्या परिस्थितीनुसार मी आहे. पण आपण माझ्या प्रश्नाचे उत्तर देत आहात की, आपली परिस्थिती सांगत आहात. आपल्या भावना ह्याच आपल्या अनुभवात रंग भरत असतात. आपणास चांगले वाटत असते . असो आपणाला जर चांगले वाटत असेल तर सर्व जग आपणाला चांगलं वाटतं पण जर आपणाला खराब वाटत असेल तर सर्व जग आपणाला दुखी वाटतं . जसे की, आपण जर चांगले असु तर वाईट गोष्ट सुद्धा आपणाला चांगली वाटते. पर्यावरण चांगलं वाटतं, आजूबाजूचा परिसरात चांगला वाटतो, वाईट व्यक्ती सुद्धा आपणाला चांगला वाटतो .सर्व गोड गोड आपणाला वाटायला लागतं. जसं की खाण्याची चव सुद्धा चांगली वाटते.[ads id="ads1"]
यामुळे आपले वर्तन सुद्धा चांगलं बनत जाते. हेच जर आपण नकारात्मक विचार करत असु तर आपणाला जेवणामध्ये सुद्धा मजा येनार नाही. आपण प्रेरणेने भरलेले असत नाही. अशा जागी थांबू वाटत नाही ज्या ठिकाणी आपण सध्या बसलेले आहोत. अशा भावना समजणे आणि त्याला नियंत्रित करणे हे आपण शिकायला हवं. यावर आपली पकड असायला हवी. जर यावर आपली पकड असेल तर ही आपल्यासाठी एक खूप शक्तीदायक मार्गदर्शक ठरू शकते. आपल्या जीवनात कोणते बदल करायचेत ? या सर्व गोष्टी आपल्या जीवनात गरजेच्या आहेत . आपणाला कळायला लागते तेव्हा पासुन हे शाळेत किंवा महाविद्यालयात आपणाला कुठेच याचं प्रशिक्षण दिल जात नाही . परिवारातील नातेवाईक सुद्धा आपणाला या गोष्टी शिकवत नाहीत .आज सर्व काही मानवाच्या सूचनेनुसार चालत आहे. मग आज एखादी सूचना अशी का नाही की आपल्या मनाने किंवा बुद्धीने कसं काम करायला पाहिजे . ? त्याचा वापर कसा करावा? चांगला उपयोग आपण आपल्या बुद्धीचा कसा घ्यायला पाहिजे. या सगळ्या भावना कशा हाताळायच्या ? आपणाला याबद्दल माहिती नसते.[ads id="ads2"]
आज आपण या लिखाणामध्ये भावनेच्या सर्व पैलू वर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये भीती तिच्या मर्यादा ओळखून आपण जे आहोत ते आपण बनु शकतो. "काही लोक पंचवीसव्या वर्षी मरतात आणि पंचाहत्तरीपर्यंत पुरले जात नाहीत."आपल्या मेंदूची वायरिंग कशी आहे हे सुद्धा आपल्याला माहित नाही. आपल्या भावना वर जास्त कशाचा प्रभाव असतो.? या गोष्टी सुद्धा आपणाला माहित नाहीत. आपला मेंदू हा जास्त जास्त नकारात्मक, नकारात्मकता ही आपल्याकडे आकर्षित करीत असतो. मी माझ्या कामांमध्ये यशस्वी होईल की नाही ? कुणी जर मला नाही म्हटलं तर कसं होईल? माझा बॉस मला कामावरून कमी करेल काय? मला जॉब लागेल काय? मी चांगल्या नोकरीवर लागेल काय.? तुम्हाला अपयशाची भीती वाटते. हे सहसा पुरेसे चांगले नसण्याच्या सर्वात खोल भीतीमुळे येते, म्हणजे तुमची थट्टा होण्याची भीती असते. आणि विश्वास ठेवता की अपयशामुळे तुमचा स्वाभिमान कमी होईल. मनुष्याला तोट्याचा तिटकारा असतो, म्हणूनच आपण अनेकदा नफा मिळवण्यापेक्षा तोटा टाळण्यासाठी अधिक प्रवृत्त असतो.तुम्हाला त्रासदायक लोकांना भीती वाटते. कदाचित या विश्वासामुळे, आपण पुरेसे महत्वाचे नाही. परिणामी, स्वार्थी दिसण्याच्या भीतीने तुम्ही स्वत:ची पुष्टी करण्यास संकोच करू शकता. या प्रकारच्या त्रासदायक भावना म्हणजे आपण आपल्या इगोला अर्थात अहमला सबळ बनवत असतो. आपल्याजवळ खूप लोक असतात. त्याच्या आवडीनिवडी सुद्धा वेगळ्या असतात. सर्वांना आपण खुश ठेवू शकत नाही .म्हणून आपण जर आपल्या स्वतःला ओळखलं तर खूप चांगलं होईल. पण हेच जर आपण सर्वांना खुश ठेवायचे प्रयत्न केले तर यामध्ये मात्र आपण दुःखी किंवा नाराज होत जाणार .हे आपल्या क्वालिटी ऑफ लाईफ वर खूप खराब परिणाम करत असतो. यासाठी आपणाला स्वतः तयार करावे लागेल. जर आपण तयार केलं नाही तर आपण खूप मोठे चुकीचे परिणाम आपल्या भावी जीवनात भोगणार हे नक्की. आपण आपल्या विचारांना पुन्हा कार्यान्वित करायला पाहिजेत. जसे की, आपले विचार जर असतील की रस्त्याने चालताना माझा अपघात होईल. तर आपण म्हणायला पाहिजे की रस्ता सुरळीत आहे. सर्व वातावरण चांगले आहे. सर्व लोक व्यवस्थित गाड्या चालवत आहेत. मग माझा अपघात होण्याचा काही काही मार्गच नाही तर आपण जर आपले विचार बदलले. तर सर्व काही छान होतं. पण हेच विचार जर आपण चुकीच्या रीतीने विचार केलेत तर मात्र त्याची फळ आपणाला चुकीची मिळायला उशीर लागत नाही.
आपणाला जो काही आनंद वगैरे मिळत असतो. तो आपल्या मेंदूमधील रसायनाच्या आधारे मिळत असतो. तर आपल्या मेंदूमध्ये डोपा माईन नावाचं एक रसायन आहे. ते रसायन आपणाला आनंद हा देत असते. आपण मोबाईल चालवत असताना जे तासनतास मोबाईल घेऊन आपण बसत असतो. तर आपण मोबाईल हा दहा मिनिटा करीता घेतो. पण आपला तोच वेळ तास दोन, तास तीन तासांमध्ये कसा जातो ? हे आपणाला कळत नाही. त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये डोपामाईन नावाचं रसायन हे सक्रिय झालेलं असतं . उदाहरणार्थ, जर तुम्हाला अल्कोहोल प्यायला आवडत असेल आणि त्याच वेळी तुम्हाला वाईट वाटत असेल तर यामुळे आपण आपला मोबाईल सोडत नसतो. डोपा माईन जर चुकीच्या रीतीने आपण आपल्या डोक्यामध्ये सक्रिय होऊ दिले तर मात्र त्याचे आपणाला चुकीचे परिणाम भोगावे लागतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला अल्कोहोल प्यायला आवडत असेल आणि त्याच वेळी तुम्हाला वाईट वाटत असेल तर तुमचा मेंदू तुम्हाला दारू पिण्याची आठवण करून देईल कारण अल्कोहोल तुम्हाला आवश्यक असलेले डोपामाइन देते. जसे की दारू पिल्यानंतर सुद्धा डोपामाईन नावाचं केमिकल हे सक्रिय व्हायला लागतं .सिगारेट पिल्यानंतर सुद्धा हे केमिकल सक्रिय होत. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपणाला आनंद देतात. त्या गोष्टी होत असताना हे केमिकल सक्रिय होते. तर याद्वारे जर आपण डोपामाईन सक्रिय करत असू तर ते आपल्या भविष्यासाठी हानिकारक आहे. डोपामाइनची एक भूमिका म्हणजे आपण अन्न शोधत आहात याची खात्री करणे जेणेकरून आपण उपासमारीने मरणार नाही, आणि तुम्ही जोडीदाराचा शोध घेता जेणेकरून तुम्ही पुनरुत्पादन करू शकता. डोपामाइनशिवाय, आमच्या प्रजाती आतापर्यंत नामशेष होण्याची शक्यता आहे. ही एक चांगली गोष्ट आहे, पण हेच जर ध्यानाद्वारे व्यायामाद्वारे आपण सक्रिय केले तर आपणाला त्याचे परिणाम चांगले बघायला मिळतात. डोपा माईन च महत्त्वाचं काम हे आपल्यासाठी खाणे धुंडणे असते. एक सहयोगी शोधणे हे सुद्धा असते. या प्रकारे दोन काम हे या रसानाची महत्त्वाची आहेत.
आपल्यासमोर कशीही परिस्थिती येऊ द्या. तिला सामोरे जाण्याची ताकद आपणामध्ये असते.
आपण नकारात्मक प्रतिमा तयार केलेली आहे तो कधी उंचावतो तर कधी खालावतो. यामध्ये इगो चा महत्त्वाचा घटक असतो. हा दुसरा तिसरा काही नसून आपण आपल्या जीवनात बनवलेली एक ओळख असते ही ओळख आपल्या विचारापासून बनत असते. आपण बनवलेल्या वास्तविक जीवनाचा वास्तविकतेसोबत हा काहीही संबंध नसतो. आपण तीच प्रतिमा तयार करतो जी आपण लोकांच्या नजरे मधून आपण स्वतःसाठी बनवलेले असते. उदाहरणार्थ नाव धर्म राजकारण त्यासोबत आपण जोडलेले असतो. इगो हा तेव्हाच समजणार जेव्हा आपण स्वतः स्वतःला ओळखणार .यामध्ये आपण आपला विश्वास आणि वास्तविकता यामध्ये फरक समजू शकता. ना चांगला आहे ना वाईट आहे. ही फक्त स्वतःच्या जागृतीची कमी आहे. जसे जसे आपण स्वतःला ओळखत जाऊ तसा तसा आपला इगो हा कमी होत जाणार. इगो हा एक आपल्या स्वतःच अस्तित्व आहे. आपणाला एका ठिकाणी किंवा नेहमीसाठी ढकलत असतो. आपली ओळख ही बनवून ठेवण्यासाठी इगो हा आपल्या चांगल्या गोष्टीचा वापर करीत असतो. जसे की जीवन जगताना कपडे चांगल्या वस्तू आपणास जर सर्वांनी चांगलं म्हटलं तर इगोला चांगलं वाटतं. आपला अहंकार कसा कार्य करतो याची आपली समज आपल्या आत्म-जागरूकतेच्या पातळीवर अवलंबून असते. चेतनेच्या सर्वात खालच्या स्तरावरील लोकांना अहंकार अस्तित्वात आहे. याची जाणीव देखील नसते. परिणामी, ते त्याचा गुलाम बनतात. दुसरीकडे, अत्यंत आत्म-जागरूक लोक त्यांच्या अहंकाराद्वारे पाहू शकतात. त्यांना समजते की विश्वास कसा कार्य करतो. विश्वासांच्या संचाची अत्याधिक आसक्ती त्यांच्या जीवनात दुःख कसे निर्माण करू शकते. प्रत्यक्षात, या व्यक्ती त्यांच्या मनाचे स्वामी बनतात आणि स्वतःशी शांती मिळवतात.
आपल्यामध्ये सहसा सहा सामान्य भावना असतात. ज्या प्रत्येकाला आधीच माहित असतात. उदाहरणार्थ;आनंद, दुःख, भीती, किळस, राग आणि आश्चर्य. या सहा भावनांपैकी, आपण भीतीशी अधिक संबंधित असू शकता. कारण आपल्या सर्वांना भीती वाटते की पालक गमावणे, नोकरी गमावणे किंवा संधी गमावणे असू शकते.
आपल्या सर्वांना माहित आहे की मानवांमध्ये नकारात्मक आणि सकारात्मक विचार असतात.भिती नियंत्रित करा आणि तुमच्या जीवनासाठी चांगले निर्णय घ्या.
जर तुम्हाला नकारात्मक भावनांचा सामना करण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल . भावना कशा कार्य करतात.
निसर्गात एक नियम आहे: गोष्टी एकतर वाढतात किंवा मरतात. माणसांच्या बाबतीतही तेच आहे. जेव्हा माणसे त्यांच्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे जात नाहीत, तेव्हा ते आतून मरायला लागतात. तुमच्या बाबतीत असे होऊ देऊ नका.
हे एखाद्या विशिष्ट गटाकडून शारीरिक नकार असू शकते, परंतु ते सामान्यतः अधिक सूक्ष्म असते. उदाहरणार्थ, तुम्हाला भीती वाटू शकेल.
त्रासदायक होण्याची भीती: तुम्हाला त्रासदायक लोकांना भीती वाटते. कदाचित या विश्वासामुळे, आपण पुरेसे महत्वाचे नाही. परिणामी, स्वार्थी दिसण्याच्या भीतीने तुम्ही स्वत:ची पुष्टी करण्यास संकोच करू शकता.
त्यांचा वापर डोपामाइनच्या रीलिझला ट्रिगर करण्यासाठी केला जातो जेणेकरून तुम्ही जोडनी केलेले राहाल आणि तुम्ही जितके जास्त काळ कनेक्ट राहाल तितके सेवा अधिक पैसे कमावतील.पोर्नोग्राफी किंवा जुगार पाहणे देखील डोपामाइन सोडण्यास कारणीभूत ठरते .ज्यामुळे या क्रियाकलापांना खूप व्यसन होऊ शकते.
सुदैवाने, प्रत्येक वेळी जेव्हा आपला मेंदू डोपामाइन सोडतो तेव्हा आपल्याला कार्य करण्याची आवश्यकता नसते.उदाहरणार्थ, आम्हाला आमचे इन्स्टाग्राम फीड सतत तपासण्याची गरज नाही. कारण ते आम्हाला डोपामाइनचा आनंददायक देते.
आपला अहंकार कसा कार्य करतो? याची आपली समज आपल्या आत्म-जागरूकतेच्या पातळीवर अवलंबून असते. चेतनेच्या सर्वात खालच्या स्तरावरील लोकांना अहंकार अस्तित्वात आहे याची जाणीव देखील नसते .आणि परिणामी, ते त्याच्या गुलाम बनतात.
दुसरीकडे, अत्यंत आत्म-जागरूक लोक त्यांच्या अहंकाराद्वारे पाहू शकतात. त्यांना समजते की विश्वास कसा कार्य करतो ? आणि विश्वासांच्या संचाची अत्याधिक आसक्ती त्यांच्या जीवनात दुःख कसे निर्माण करू शकते.? प्रत्यक्षात, या व्यक्ती त्यांच्या मनाचे स्वामी बनतात. स्वतःशी शांती मिळवतात.
लक्षात घ्या की अहंकार चांगला किंवा वाईट नाही, तो केवळ आत्म-जागरूकतेच्या अभावाचा परिणाम आहे. अहंकार व जागरुकता एकत्र राहू शकत नाही. म्हणून ती संपते.
तुमचा अहंकार सामान्यतः ज्या गोष्टींवरून ओळखतो त्यांची यादी:
आपले शरीर
आपले नाव
आपले लिंग
आपले राष्ट्रीयत्व
आपली संस्कृती
आपले कुटुंब/मित्र
आपल्या श्रद्धा (राजकीय समजुती, धार्मिक इ.)
आपली वैयक्तिक कथा (भूतकाळातील तुमची व्याख्या, भविष्याबाबत तुमच्या अपेक्षा)
आपल्या समस्या (आजार, आर्थिक परिस्थिती, पीडित मानसिकता इ.)
आपले वय
आपले काम
आपली सामाजिक स्थिती
आपली भूमिका (कर्मचारी, गृहिणी, पालक स्थिती, रोजगार स्थिती इ.)
साहित्य वस्तू (तुमचे घर, कार, कपडे, फोन इ.)
आपल्या इच्छा
आपला अहंकार कसा कार्य करतो हे समजून घेतल्याने आपनाला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येते. हे करण्यासाठी, आपण प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की आपली वर्तमान कथा लोक, गोष्टी किंवा कल्पनांशी मजबूत ओळखीचा परिणाम आहे. ही मजबूत ओळख आपन आपल्या आयुष्यात अनुभवत असलेल्या अनेक नकारात्मक भावनांचे मूळ आहे.
नकारात्मक भावना अनुभवल्याबद्दल आपण स्वतःला दोष देऊ शकता. किंवा कदाचित आपण स्वतःला मानसिकदृष्ट्या कमकुवत समजता. आपल्यात काहीतरी चूक आहे .
अशा प्रकारे, उदास असण्यामुळे तुम्ही तीन आठवड्यांपूर्वी तुम्ही आनंदी होता त्यापेक्षा कमी व्यक्ती बनत नाही. आता उदास वाटत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुन्हा कधीही हसू शकणार नाही.
हे लक्षात ठेवा .तुम्ही ज्या प्रकारे भावनांचा अर्थ लावता, तसेच तुम्ही ज्या दोषाच्या खेळात गुंतता.
पण प्रमाणापेक्षा जास्त कोणतीही गोष्ट जर केली तर ती घातक असते. आपण दिवसभरात कधीकधी आनंदी तर कधीकधी दुःखी असतो .पण त्या दुःखी भावना कशा आहेत हे आपण जाणत नाही. आपण खूप नकारात्मक राहत असाल .पण कधी कधी नैराश्य, असुरक्षितता, लाज वाटणे ,हे आपण स्वतःला सांगत असतो .किंवा अनुभवात असतं हे सर्व काही नॉर्मल असतं. पण याचा विचार आपण कसा करतो ? हे आपल्यावर आहे. हा सगळा भावनांचा खेळ आहे .ज्या प्रकारे ऊन आणि सावली असते . ते ये जा करीत असते .त्या प्रकारे आपल्या डोक्यामध्ये विचार येतात व जात असतात .पण त्यावर प्रतिक्रिया आपण कशी देतो हे आपल्यावर अवलंबून असतं .भावना ह्या कधीकधी फायद्याच्या सुद्धा असतात. मोठ्यात मोठ्या व्यक्तींनी सुद्धा नैराश्य ने ग्रासलेलं असतं. बऱ्याच वेळा बरेच लोक हे खूप वेदने मध्ये राहत असतात . वेदना सहन करत असतात जसं की एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन होत असताना त्याला खूप वेदना होतात. पण ऑपरेशन झाल्याच्या नंतर मात्र त्याच्या वेदना कमी होऊन जातात. तो स्वतःला चांगलं वाटायला लागते. याच प्रकारे आपल्या भावभावना सुद्धा असतात . प्रत्येकाच्या जीवनात कठीण काळ हा नेहमी येतच असतो. ज्यामध्ये आपण नकारात्मकतेला जास्त वाव देतो .आपल्या संपर्कातील लोकांबद्दल आपले जे काही विश्वास आपण बनवलेले असतात. ते आपण बदलायला पाहिजेत नकारात्मक गोष्टी ह्या मनात दाबून ठेवणे स्वतःला तकलीफ देणे हे आपण विसरायला पाहिजे. ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्याचा खात्मा करायला पाहिजे. यासाठी जर आपणाला कुणाला मोबाईलवर बोलायची वेळ येत असेल तर बोला,त्याला माफी मागा जर कुणाची गळा भेट घ्यायची इच्छा होत असेल तर गळाभेट घेऊन घ्या. जर कुणाला मेसेज टाईप करायचं काम पडत असेल तर मेसेज टाईप करा . यामध्ये कोणत्याही प्रकारची हीचकीच करू नका. कारण ज्या प्रकारे अन्नाची एक ऊर्जा बनत असते .त्याच प्रकारे नेहमी नेहमी आपण विचार करून सुद्धा विचाराची सुद्धा एक ऊर्जा बनत असते. ती ऊर्जा जर आपल्या शरीराच्या किंवा डोक्याच्या बाहेर निघाली नाही तर त्या नकारात्मक ऊर्जेचे रूपांतर हे रोगामध्ये होतं. मग रोगाचे रूपांतर हे मोठ्या शारीरिक आजारामध्ये होतं. तर यासाठी भावना दाबणे हे किती घातक आहे .हे आपण समजलेले आहात. आपणा स्वतःला तोडणार हे दुसरं कोणी नसून आपण स्वतःच आहोत. आपण आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल हा दुसऱ्याच्या हातात देत असतो. जर एखाद्याने आपणाला शिव्या दिल्या तर त्याने मला शिव्या दिल्या त्याने मला शिव्या दिल्या हे आपण वारंवार आपणास स्वतःला सांगत असतो .पुढील व्यक्ती हा एक वेळ शिव्या देतो आणि तो निघून जातो पण आपण मात्र वारंवार स्वतःला जाणीव करून देत असतो. की त्याने मला शिव्या दिल्या त्याने मला शिव्या दिल्या त्याचं एक उदाहरण देऊन सांगायचं झालं तर दिवाळीला आपण एक छान असा शर्ट घेतो त्याचा कलर आपण निवडतो. त्याचे पैसे सुद्धा आपण देतो. घालायला सुद्धा आपणासाठी आपण आणतो. आपण घातल्याच्या नंतर उद्या आपण मित्राच्या समूहामध्ये गेल्यावर त्यातील कुणीतरी एकानं म्हटलं की अरे हा शर्ट तुला चांगला दिसत नाही. तर उद्यापासून आपण तो शर्ट घालने बंद करतो. का तर पुढील व्यक्तीला तो शर्ट आवडत नसतो. म्हणून म्हणजे आपण आपलं रिमोट कंट्रोल हे दुसऱ्याच्या हाती दिलेलं आहे का हे आपण स्वतःला विचारायची गरज आहे.?
आपल्या भावना ह्या सकारात्मक पाहिजेत आपल्या डोक्यामध्ये नेहमी चांगल्या कल्पना आल्या पाहिजेत. आपलं डोकं हे नेहमी सृजनात्मक असायला पाहिजे. या उलट आपण आपला जो आत्मविश्वास आहे तो आपण कमी करून घेतो .आपण आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येणार नाही हे स्वतःला सांगत असतो. आपली जी प्रेरणा आपल्या प्रेरणेचा जो स्तर घसरलेला आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये आपण आपल्या वातावरणाला नेहमी दोष देत असतो. आपल्या मनासारख्या कंडीशन आपल्या सभोवताली नसतात. पण याने आपल्यावर कोणताही फरक पडत नाही तर आपल्या आतील विचाराचा आपल्यावर खूप मोठा फरक पडत असतो .
आपल्या जीवनामध्ये जर काही वाईट घडलं तर ते आपण चांगलं करू शकतो हे आपण स्वतःला सांगायला पाहिजे. पण जर फक्त आपण आपल्या अडचणीचा विचार करत असू तर मात्र आपणाला नैराश्य येणं सहाजिक आहे. आपण आपल्या अडचणीचा विचार न करता त्या अडचणीवर उपाय काय आहेत याचा विचार करायला पाहिजे .पण सध्या लोकमात्र माझ्याजवळ पैसे नाहीयेत माझी परिस्थिती चांगली नाहीये मला चांगले वातावरण मिळत नाहीये या प्रकारच्या अडचणी आणि अडचणी सांगत असतात. यावर आपण चांगले उपाय काय करू शकतो. या गोष्टी कोणीही स्वतःला सांगत नाही आणि म्हणून या परिस्थितीच्या आपण बाहेर येत नाही. नकारात्मक भावना ह्या फक्त आपल्या डोक्यात असतात. सर्व अडचणी ह्या एकाच वेळी सोडवण्याची गरज सुद्धा नसते. पुढील वेळी नकारात्मक भावना आल्या की त्याला रेकॉर्ड करा हे केल्याने त्याचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आपणाला कळेल. जेव्हा नकारात्मक असतो तेव्हा आपण रागात असतो. आपण चिडचिड करीत असतो आपले आंतरिक विचार हे आपनाला दुःखी करत असतात. ही सफरिंग आपली जास्त ऊर्जा खात असते. झोपताना आपण जवळ मोबाईल वापरू नका झोपण्याअगोदर जवळपास दोन तास मोबाईल दूर ठेवा. झोपताना जास्त पाणी पिऊ नका. यामुळे आपणाला रात्री झोप चांगली लागत नाही. आपली बॉडी लँग्वेज म्हणजेच देह बोली ही चांगली ठेवा. आपली देहबोली बदलत असतो जसे आपण स्वतःला समजणार त्याच प्रकारे अन्य लोक सुद्धा आपणाला समजणार आपले विचार हेच आपणाला चांगले किंवा वाईट बनवत असतात .आपले विचार आपले व्यक्तिमत्व बनवत असतात .देहबोली आणि भावना याच आधारे बनत असतात .आपण आपल्या विचारांना नियंत्रित करायला शिकले पाहिजे. यासाठी आपण ध्यान करणे खूप गरजेचे आहे. ध्यानामुळे आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी ही जवळपास 64% येते आणि याच्यामुळे आपले नकारात्मक विचार सकारात्मक होण्यास सुद्धा खूप मदत मिळते. आपले शब्द आपल्या भावनावर परिणाम करीत असतात. आपले विचार असे आपल्या वर्तनावर सुद्धा परिणाम करत असतात . हे एकमेकांमध्ये जुळलेले असतात. जेव्हा आपला आत्मविश्वास कमी असतो तेव्हा मी प्रयत्न करतो , आशा आहे, माझी इच्छा आहे .या प्रकारचे शब्द आपण वापरत असतो. पण जर आपणामध्ये आत्मविश्वास वाढलेला असेल तर हेच शब्द आपण माझे प्रयत्न यशस्वी होणार ,मी ते यशस्वी होणार, या प्रकारे आपण दिवसभरात आपण स्वतःला सकारात्मक सूचना ह्या दिल्या तर याचा खूप चांगला फायदा आपणाला होतो .याचा उपयोग आपण एक महिना जर केला तर याचे चांगले निकाल स्वतःला मिळतील .आपला विश्वास आपल्या भावनावर खूप परिणाम करीत असतो. चांगल्या रीतीने श्वास घ्यायला आपण शिकले पाहिजे. ज्याप्रमाणे लहान मूल हे श्वास घेत असते. त्याप्रमाणे आपण श्वास घ्यायला पाहिजे. पण यावर आपण जास्त लक्ष देत नाही श्वासामुळे बऱ्याचश्या बीमार्या आणि अडचणीच्या आपल्या दूर होतात.
अति विचार केल्याने आपण नकारात्मक बनत जातो आपल्या डोक्यात सतत काही ना काही प्रकारचे विचार येत असतात. जेवढे आपण त्याला भेट देणार तेवढे ते नकारात्मक होत जाणार .काहीही झालं तरी त्या परिस्थितीला आपण आपल्या अडचणी जोडत असतो. जसे की जीवनात जगत असताना आपणाला पैशाची अडचण येत असेल. तर हे काम झालं असतं जर माझ्याजवळ पैसे असते.
यासाठी आपण एक सूत्राचा वापर करायला.
जर आपण नकारात्मक परिस्थितीबद्दल विचार करत असाल तर स्वतःला सांगा की पुढे धोका आहे. हे नवीन रस्ते आपणाला मिळणार आहेत. नवीन संधी ह्या माझ्यासाठी उघडणार आहेत .आज पेक्षा आणखी माझं खूप चांगलं होणार आहे. आपण सर्वांनी खाटकाला बघितलं असेल किंवा मटणाची दुकाने पाहिली असतील. त्यामध्ये आपण गेल्यानंतर आपणाला चुकीचं वाटायला लागते आपणाला किळस यायला लागते. आपणाला कधी कधी उलट्या सुद्धा होतात .पण खाटकाला मात्र काहीच वाटत नाही. तो त्याचा व्यवसाय झालेला असतो. म्हणजे आपण आपल्या विचारामुळे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आपल्या जीवनात दुःख परेशानी ह्या आपल्या अतीविचारांमुळे आलेल्या असतात. आपल्या जवळपास जर कोणी मृत पावलं असेल तर तो फक्त मेला आहे. असं म्हणा तो खूप वृद्ध होऊन मेला. कमी वयात मेला असं लेबलिंग करू नका. आपण आपले विचार नकारात्मक बनवलेले आहेत. तर त्याला आपण स्वतः जबाबदार आहोत जर आपण नकारात्मक बनवू शकतो. तर त्याला आपण सकारात्मक सुद्धा बनविले पाहिजेत.
ज्याप्रमाणे आपण आपल्या अचेतन मनाला प्रशिक्षित करीत असतो. त्याप्रमाणे ते मन बनत जात असते. ज्याप्रमाणे एखादा शेतकरी हा आपल्या शेतीमध्ये कोणत्या प्रकारचे बियाणं घ्यायचं ही त्याची निवड असते. त्या जमिनीला कोणत्याही प्रकारचे देणे घेणे नसते. की या जमिनीमध्ये आता काय पडणार आहे. याच प्रकारे आपण कोणते ? विचार हे करणार व चेतन मनाला देणार आहोत. ते अचेतन मन हे त्याच्यावर डायरेक्ट अंमलबजावणी करीत असते. मग ते विचार चुकीचे आहेत की वाईट आहेत याचा विचार अचेतन मन हे करत नाही. आपले विचार हे आपली ओळख बनवितात. आपली ओळख बिघडवून सुद्धा शकतात म्हणून नेमकं काय निवडायचं ? हे आपण ठरविले पाहिजे आपण आणखी काय नाही तर आपण आपल्या विचारांचा परिणाम आहोत .आपण चांगले नाही असं म्हटलं तर ते त्या प्रकारे बनत जाते. जसं भविष्यात बनायचे आहे तसेच आपण विचार केले पाहिजेत. किंवा आपल्या मनाला सुचित केले पाहिजे. आपण आपले विचार आणि भावना बदलायला पाहिजेत. विचार बदलल्यानंतर आपोआप आपली देहबोली बदलते. देहबोली बदली की भावना सुद्धा बदलायला लागतात. आपणाला जर कुणाच्या विचारामुळे किंवा कुणाकडे बघून वाईट वाटत असेल तर त्या गोष्टी आपण सोडायला पाहिजे . जसे की, फेसबुकवर आपणाला एखाद्याचा चमचमट बघून असं वाटायला लागतं की पुढील व्यक्तीचं हे खूप छान आहे. तर तसं वाटत असेल तर आपण त्याला दूर ढकला किंवा त्या साईडला भेट देऊ नका. जेणेकरून आपणाला तकलीफ होणार नाही. जर आपणाला असं वाटत असेल की फक्त मलाच या प्रकारचे दुःख आहे दुसरे कुणालाच दुःख नाही पण जर विचार केला तर याच प्रकारचे दुःख प्राण्याला किंवा इतर दुसरे जे कोणते पक्षी असतील त्यांना सुद्धा असेल का? आपल्यासारखेच नैराश्य, उदासी, ह्या भावना दुसऱ्या सुद्धा प्राण्याला येत असतील काय ? जर येत असतील तर ते काय करत असतील. याचा विचार आपण करायला पाहिजेत. यामध्ये त्या प्राण्याला जर अशा प्रकारच्या भावभावना तयार झाल्या उदासी, आली चिंता, आली नैराश्य आलं तर ते प्राणी स्वतःचा रस्ता हा स्वतः काढतात. पण आत्महत्या सारखे विचार किंवा स्वतःला हानी करणारे विचार यापासून ते स्वतःला बचावत असतात.
आपल्या भावना चांगल्या करण्यासाठी आपण आपला जो माईंड सेट आहे. तो आपण चांगला करायला पाहिजे. आपण स्वतःला एवढं निपुन केलं पाहिजे की मी माझ्या क्षेत्रामध्ये खूप चांगला बनणार त्यासाठी जी जी मेहनत आहे. ती ती आपण स्वतः करायला पाहिजे . जसं की सकाळी उठून व्यायाम करणे, झोपण्याच्या अगोदर अभ्यास करणे, जास्तीत जास्त वाचन करणे ,ध्यान करणे, योगा करणे , स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजेत. बरेचसे लोक हे स्वतः चूक झाल्याच्या नंतर म्हणतात की, आपण या चुकी मधून शिकवू पण नेहमी जर आपण अशा चुका करत असू तर आपला वेळ आणि आयुष्य खूपच यामध्ये वाया जाईल . यासाठी जर नेहमी आपण इतरांच्या चुका पासून जर धडा घेतला तर आपल्यासाठी खूप फायद्याचे होईल. यामधून आपणाला काहीतरी शिकायला मिळते आपण स्वतःला कामामध्ये नेहमी व्यस्त ठेवायला पाहिजे. जेणेकरून चुकीच्या प्रकारचे विचार आपल्यामध्ये येणार नाहीत. आपणाला आपण स्वतःला जे जास्तीत जास्त पसंत आहे ते आपण करायला पाहिजे .जेणेकरून आपणाला 10 ते 05 या वेळेमध्ये घड्याळीकड पाहण्याची जास्तीत जास्त वेळ येणार नाही. म्हणून आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे. जेणेकरून त्याच्यामध्ये आपणाला आनंद मिळायला लागेल. नवीन गोष्टी नेहमी आपण शिकत राहायला पाहिजे. यामुळे आपली सृजनक्षमता ही वाढत असते .एखाद्या व्यक्तीला खुश कसं ठेवता येईल याच्याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष ठेवले पाहिजे. जेणेकरून त्याच्या खुशीमध्ये आपण आपली खुशी पण बघत असतो. त्याचे जे काही संवेदन आहेत.( व्हायब्रेशन) संवेदना आहेत ते आपल्यामध्ये येत असतात. नकारात्मक संवेदना (व्हायब्रेशन) यामधून खतम होऊन जातात. या गोष्टीला जर आपण सतत 14 दिवस याचा सतत अभ्यास केला तर आपणाला नेहमी याची सवय पडून जाते . ज्याप्रमाणे एखादी जादू असते या जादू प्रमाणे आपणाला याचे निकाल मिळतात. आपण आपल्या क्षेत्रामध्ये नेहमी अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करत रहा. आपण जर अंतर मुखी असाल तर आपण आपल्या क्षेत्राशी निगडित आपले करिअर हे शोधले पाहिजे. त्यामुळे आपण नेहमी आनंदी राहो आणि आपली प्रेरणेची कमतरता ही कधीही आपणाला जाणवणार नाही. ज्या गोष्टी आपणाला तकलीफ देतात त्यातून बाहेर कसं येणार याची एक यादी आपण स्वतः करायला पाहिजे. आपल्या प्रत्येक अडचणी वरचे उत्तर हे आपल्या जवळ आहे. ते उत्तर इतर अन्य कुना ही जवळ नाही पण आपण त्याला बाहेर शोधत असतो. ज्याप्रमाणे हरीण ची कस्तुरी हे हरीण च्या आत असते ते त्याची कस्तुरी हे बाहेर धुंडत असतं .त्याप्रमाणे प्रत्येक समस्येचे उत्तर हे आपल्याजवळ आहे त्याचे उत्तर आपल्याशिवाय इतर कुणालाही माहीत नाही.
प्रमोद पडघान ( मानसशास्त्रज्ञ )
रा. आडोळी ता. जि. वाशिम
संपर्क ९०७५९७७२३९.


