यावल/रावेर (विनोद हरी कोळी) 10 मे 2018 चे शासन आदेशानुसार दिव्यांग हृदय सम्राट मा. मंत्री आदरणीय बच्चुभाऊ कडू साहेब यांचे प्रयत्नाने सुरू झालेली 5/ टक्के कल्याणकारी निधीची रक्कम 7 लाख 9 हजार 400 रुपये यावल शहरातील एकूण 333 दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्रानुसार त्यांचे बँक खात्यांवर वितरित करण्यात आली आहे.[ads id="ads1"]
त्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. अनिल भाऊ चौधरी. प्रहार शेतकरी संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष मा. सुरेशदादा चिधू पाटील, प्रहार शेतकरी संघटना यावल तालुका अध्यक्ष मा. गोकुळ भाऊ कोळी, प्रहार जनशक्तीचे यावल शहर अध्यक्ष माजी नगराध्यक्ष अण्णासाहेब तुकाराम रघुनाथ बारी, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उपाध्यक्ष मा. दिनेश भाऊ सैमिरे, कायदेशीर सल्लागार अँड. गोविंदा मधुकर बारी यांनी यावल नगरपरिषद प्रशासक तथा प्रांत साहेब मा.कैलास कडलग साहेब, मुख्याधिकारी हेमंत निकम साहेब यांचे विशेष आभार मानले आहेत.[ads id="ads2"]
दिव्यांगांचे दैवत आदरणीय बच्चुभाऊ कडू यांच्या प्रयत्नाने सतत 3 वर्षापासून निधी मिळत आसलेने दिव्यांगांमध्ये आनंदी वातावरण असून समाधान व्यक्त करीत आहे. त्यांनीही मा. बच्चू भाऊंचे व नगर पालिका अधिकारी कर्मचारी यावल यांचे आभार मानले आहेत
दिव्यांगांना निधी मिळवण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श दिव्यांग कर्मचारी पुरस्कार प्राप्त यावल पालिकेचे दिव्यांग कर्मचारी तथा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष मोहन भाऊ सोनार हे यावल मधील दिव्यांगांची माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शन करून न.पा. कडे पाठपुरावा करीत असतात.
यावल तालुका प्रहार दिव्यांग संघटने कडून मा. बाळासाहेब पाटील जिल्हाध्यक्ष यांचे आदेशाने यावल न.पा. कडे निधी मिळवण्यासाठी लेखी निवेदन सादर केले होते त्याची दाखल घेण्यात आली आहे
तसेच यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना देखील निधी मिळवण्यासाठी यावल प्रहार दिव्यांग संघटनेने मा. गटविकास अधिकारी सो पंचायत समिती यावल यांच्याकडे लेखी निवेदन सादर केलेले असून संघटनेचे पदाधिकारी अँड. गोविंदा बारी, यावल तालुका उपाध्यक्ष प्रदीप माळी, राहुल सावखेडकर, सुकलाल धंजे, जनार्दन फेगडे शाहरुख पटेल ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांची संपर्क करीत आहे.