अध्यक्षपदी पुरुषोत्तम साठे तर उपाध्यक्षपदी सलीम तडवी यांची निवड
यावल ( सुरेश पाटील)
महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ शाखा यावल जि . जळगाव यांच्या कार्यकारिणीची सभा शनिवार दि.4 रोजी यावल येथील सीताबाई दामोदर देवकर स्कूलमध्ये महासंघाच्या जिल्हा सहसचिव सलीम इस्माईल तडवी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. [ads id="ads1"]
सभेस जिल्हा सदस्य धनंजय काकडे,तालुका सचिव खेमचंद खाचणे, सहसचिव शकिल तड़वी, प्रसिद्धी प्रमुख मोईन शेख माजी अध्यक्ष आशिष बोरोले,सदस्य रोहित भालेराव,प्रकाश जयकारे सुनिल श्रावगी,अभिमन्यू पाटील,दिनेश इंगळे, मनोजकुमार करांडे,जावेद शेख यांचे उपस्तीथित तालुका अध्यक्ष म्हणून पुरुषोत्तम साठे व तालुका उपाध्यक्ष सलीम जमशेर तडवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.