यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील अट्रावल शिवारात एका शेतकऱ्याची कापणीवर असलेल्या केळी बागेतील 9 हजार केळी खोडांपैकी 7 हजार केळीची खोडे एका अज्ञात माथे फिरुने कापून शेतकऱ्याचे 25 लाख रुपयांचे नुकसान केले,शेतकऱ्यांने फिर्याद दिल्यावरुन याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की अट्रावल येथील रहिवासी राजेंद्र चौधरी यांच्या यावल शेतातील एक हेक्टर 86 आर या क्षेत्रात केळीची नऊ हजारावर रोपाची लागवड करण्यात आली आहे, शनिवार दि.4 रोजी राजेंद्र चौधरी आणि त्यांचा मुलगा भूषण चौधरी तसेच सोबत राकेश पावरी व राहुल पावरी हे शेतात काम करण्यासाठी गेले होते,दुपारी 2 वाजेच्या सुमारास मात्र ते गेले नव्हते रविवारी सकाळी भूषण चौधरी हा शेतात केळी पाहणी साठी गेला सकाळी आठच्या सुमारास त्याच्या शेतातील केळीच्या 7 हजार केळी खोडासह केळी घडांची माथे फिरूने कापून नुकसान केल्याचे दिसून आले, याबाबतची माहिती भूषण चौधरी यांनी वडील राजेंद्र चौधरी यांना मोबाईलवरून संपर्क साधून दिला दिली राजेंद्र चौधरी यांनी सुद्धा भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत परिसरातील शेतकऱ्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती सांगितली परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत केळीचे नुकसान केल्याचे पाहून तीव्र संताप व्यक्त केला याबाबत राजेंद्र चौधरी यांनी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात शेतकऱ्याचे 25 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.[ads id="ads2"]
या आधी देखील यावल तालुक्यात अनेक शेती शिवारामध्ये केळी व अन्य पिकाची नासधूस करण्याचे प्रकार घडलेले आहेत आता पुन्हा एकदा असाच मोठा प्रकार घडल्याने लोकप्रतिनिधी,पोलीस यांनी प्रत्येक गावातील पोलीस पाटील,पीक संरक्षण सोसायटी संबंधितांची मीटिंग घेऊन बकऱ्या व गुरे-ढोर चालणाऱ्यांसह शेती शिवारात चारा व इतर कामासाठी भटकंती करणाऱ्याना महत्त्वाच्या सूचना दिल्यास यापुढे असे प्रकार घडणार नाही याबाबत ठोस निर्णय घेऊन कार्यवाही करावी असे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.
हेही वाचा :-रावेर तालुक्यातील हायप्रोफाईल जुगार अड्यावर एलसीबीची धाड ; 17 संशयित ताब्यात : लाखोंच्या रोकडसह 14 वाहनेही जप्त
हेही वाचा :- RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला सुरुवात ; पहिली ते आठवीपर्यंत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ; फॉर्म भरण्यासाठी "हे" कागदपत्रे लागणार


