ऐनपुर परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन सर्रास सुरू,महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  


ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल) रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील भगवती मंदिर परिसरात असलेल्या ग्रामपंचायत ऐनपुर यांच्या मालकीच्या बरड्यांचे काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे.

सविस्तर वृत्त असे की, ऐनपुर येथील ग्रामपंचायत मालकीच्या असलेल्या सुलवाडी रस्त्यावरील भगवती मंदिर परिसरात असलेल्या बरड्यांचे जेसीबी मशीन च्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते आहे हे उत्खनन करून रस्त्यावर व लोकांच्या खाजगी घरांच्या भराव करण्यासाठी वाहतूक करुन टाकला जातो आहे.[ads id="ads1"]  

  बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या या उत्खनन व वाहतूकीवर ऐनपुर येथील महसूल विभागाचे तलाठी व ऐनपुर मंडळाचे मंडळ अधिकारी यांनी पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे ऐनपुर येथील बसस्थानक परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल चौक या ठिकाणावरून ट्रॅक्टर च्या ट्राॅली च्या ट्राॅली भरुन जातांना दिसत आहेत हे ठिकाण भरपूर वर्दळीचे असून या गौणखणीज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांकडे सर्वांचे लक्ष असते परंतु ग्रामस्थांकडून एकच सुर निघतो की याकडे प्रशासनाचे लक्ष नाही का ? ग्रामस्थांनी आपला प्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात पाठवले आहे.[ads id="ads2"]  

हेही वाचा :- RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला सुरुवात ; पहिली ते आठवीपर्यंत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ; फॉर्म भरण्यासाठी "हे" कागदपत्रे लागणार

 हेही वाचा :-रावेर तालुक्यातील हायप्रोफाईल जुगार अड्यावर एलसीबीची धाड ; 17 संशयित ताब्यात : लाखोंच्या रोकडसह 14 वाहनेही जप्त

ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचे याकडे लक्ष नाही का? तलाठी व मंडळ अधिकारी यांना आजपर्यंत हे गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर दिसले नाही का? की यांचे सर्वांचे या या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या सोबत काही साटेलोटे तर नाही ना? महसूल विभाग यांच्याकडे वाहतूक करीत असलेल्या मुरूम, गिट्टी,माती यांची राॅयल्टी भरली आहे किंवा नाही? ग्रामपंचायत सरपंच,सदस्य,व कर्मचारी हे काही आर्थिक संबंध तर जोपासत नाही ना ? असा सुर ऐनपुर येथील ग्रामस्थांमधून निघत आहे प्रशासनाने यांची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!