आज दिनांक 6 मार्च च्या दिवसभरातील ठळक बातम्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

▪️राज्यात पुढील तीन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज, नाशिकसह धुळे आणि बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस, शेती पिकांना फटका


▪️कोकण म्हाडाची 4 हजार 752 घरांची लॉटरी, 8 मार्चपासून अर्जविक्री तर 10 मे रोजी सोडत, विरार-बोळींजमध्ये तब्बल 2 हजार 48 घरांची होणार विक्री


▪️चोरांना तुम्ही आशिर्वाद देणार का?: उद्धव ठाकरेंचा सवाल, म्हणाले - मिंध्येंच्या हातात धनुष्यबाण दिला पण चेहरा चोरासारखा झाला

[ads id="ads1"]  

▪️ठाकरे गटात प्रवेश करताच संजय कदमांचा हल्लाबोल: शिवसैनिक म्हणून ज्या केसेस घेतल्या त्या आम्ही घेतल्या, रामदास कदमांनी नव्हे!


▪️भाजपात आल्यावर कुणाची चौकशी बंद झाली?- देवेंद्र फडणवीस: तुमच्या शेजारी बसणाऱ्या ठाण्यातील नेत्याकडे पाहा- शरद पवार


▪️भारतात बनणार छोटी विमाने: उत्पादनासाठी एम्ब्रेयर आणि सुखोईसोबत चर्चा, दूरवरच्या लोकांना होणार फायदा


▪️सिसोदिया प्रकरणी 9 विरोधी नेत्यांचे PM मोदींना पत्र: म्हणाले - अटकेमुळे भारतीय लोकशाहीचे हुकूमशाहीत रुपांतर झाल्याचे सिद्ध झाले


▪️पंजाबमधील G20 परिषद रद्द होण्याची शक्यता: सुरक्षेच्या दृष्टीने घेतला निर्णय, काँग्रेस आमदारांचे ट्विट; अधिकारी आणि सरकार गप्प


▪️गुंतवणूकदारांचे नुकसान करून पैसे कमवणे हिंडेनबर्गचे काम: ज्येष्ठ वकील हरीश साळवे; म्हणाले- हिंडेनबर्ग अहवालाची चौकशी गरजेची

[ads id="ads2"]  

▪️WPL च्या दुसऱ्या सामन्यात DCने RCB चा केला पराभव: अमेरिकेच्या तारा नोरिसने घेतले 5 बळी; शेफाली वर्माचे हुकले शतक


▪️भारत-ऑस्ट्रेलिया चाैथी कसाेटी गुरुवारपासून: गाेलंदाज शमीचे हाेळीनंतर भारतीय संघात पुनरागमन


▪️महाकाल दर्शनावर विराट-अनुष्काचे कंगना रनोटने केले कौतुक: म्हणाली- यामुळे सनातन धर्माला अधिक बळ मिळेल


▪️'टायगर 3' हिट करण्यासाठी निर्मात्यांची नवी शक्कल: शाहरुख आणि सलमानचा 'पठाण'मधला सीन चित्रपटात होणार रिपीट

हेही वाचा :-रावेर तालुक्यातील हायप्रोफाईल जुगार अड्यावर एलसीबीची धाड ; 17 संशयित ताब्यात : लाखोंच्या रोकडसह 14 वाहनेही जप्त


हेही वाचा :- RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला सुरुवात ; पहिली ते आठवीपर्यंत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ; फॉर्म भरण्यासाठी "हे" कागदपत्रे लागणार

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!