ऐनपूर महाविद्यालयाची औद्योगिक भेट

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) ऐनपूर येथील स. व. प. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाची नूकतीच औद्योगिक भेट बॉंड लाईफ प्रायव्हेट लीमिटेड पैठण येथे झाली. या भेटीमध्ये इंडस्ट्री मधील विविध विभागातील कामाची सविस्तर माहिती डॉ. हरीश जोशी यांनी दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना रासायनिक अभिक्रियेसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या रियाक्टर्स ची उदाहरणे देऊन प्रत्यक्ष माहिती दिली. इंडस्ट्री मध्ये प्रत्येक विभागात योग्य पद्धतीने काळजी कशी घ्यावी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. [ads id="ads1"]  

पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये औद्योगिक भेटी हा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक आवश्यक भाग आहे. औद्योगिक भेटी सैद्धांतिक शिक्षण आणि व्यावहारिक एक्सपोजरमधील वाढणारी दरी कमी करतात तसेच वर्गातील शिक्षणाच्या पलीकडे जाण्याच्या हेतूने औद्योगिक दौरे विद्यार्थ्यांना बाजारातील सध्याचे ट्रेंड, उद्योगाची भविष्यातील परिस्थिती आणि उद्योगात लागू होत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल शिक्षण देऊन सर्वांगीण विद्यार्थ्यांच्या विकासात मोठा हातभार लावतात. यादरम्यान इंडस्ट्री बद्दल विद्यार्थ्यांचे असणारे कुतूहल आणि शंकाचे झालेले निरसन पाहायला मिळाले. [ads id="ads2"]  

सदर औद्योगिक भेटीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने आणि रसायनशास्त्रचे विभागप्रमुख डॉ. एस. एन. वैष्णव  यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. डी. बी. पाटील यांच्याकडून औद्योगिक भेटीचे आयोजन आणि नियोजन करण्यात आले. या औद्यीगिक भेटीसाठी रसायनशास्त्र विभागातील प्रा. संकेत चौधरी, प्रा. काजल महाजन, प्रयोगशाळा परिचर श्री. नितीन महाजन व एकूण ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!