यावल ( सुरेश पाटील)
यावल शिवारातील तीन मोठे जिवंत वृक्ष अंदाजे 25 हजार रुपये किमतीचे शेतमालकाच्या संमतीविना परस्पर तोडून 25 हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी पटेल नामक लाकडाचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध यावल पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली.[ads id="ads1"]
अवैध बेकायदा वृक्षतोड करून आणि दादागिरीने शेतमालक तथा सोने चांदीचे व्यापारी असलेल्या फर्म मध्ये जाऊन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी यावल पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल येथील मेन रोडवरील रवींद्र दगडूशेठ सोनार यांचे यावल शिवारात शेत गट नंबर 664/1/2 मध्ये शेतातील बांधावरील एक बाभूळ,एक निंब, एक कहीटाचे झाड,यावल येथील रहिवासी आणि लाकडाचा व्यवसाय करणारा पप्पू छोटू पटेल राहणार विरारनगर यांनी शेत मालकास न विचारता परस्पर तीन जिवंत वृक्ष कापून टाकले त्यांचे 25000 रुपयाचे नुकसान केल्याची तक्रार नमूद केल्याने पप्पू पटेल यांनी तक्रारदार रवींद्र सोनार यांच्या दुकानात जाऊन संदीप रामदास गुरव आणि स्वप्निल रवींद्र देवरे यांच्यासमोर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलिसात नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
यावल शहरात नव्हे तर तालुक्यात शेतकऱ्यांच्या संमतीविना अशी अनेक झाडे परस्पर कापून नेल्याचे प्रकार होत असून वाहतूक करताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मात्र याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे जेणेकरून वनसंपत्तीचा जो ऱ्हास होत आहे त्याला आळा बसेल.यासाठी प्रशासकीय यंत्रणेंनी आपले लक्ष केंद्रित करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.