60 वर्षीय वयोवृद्धाची गळा चिरून हत्या ; जळगाव जिल्ह्यातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव (Kingaon Taluka Raver Dist Jalgaon) येथील इंदिरानगर भागातील रहिवाशी 60 वर्षीय वृद्धाची गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सकाळी उघडकीस आल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे. [ads id="ads1"]  
  यावल तालुक्यातील चुंचाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका नाल्याच्या पुलाखाली शुक्रवारी सकाळी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला असून घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.

गळा चिरून केली हत्या

किनगाव ता. यावल (Kingaon Taluka Yawal Dist Jalgaon)  येथील इंदिरानगर भागातील रहिवासी भीमराव सोनवणे वय 60 वर्षे हे व्यवसायाने ट्रक चालक (Truck Driver) होता व रात्री घरी आलेले नव्हते. [ads id="ads2"]  

  शुक्रवारी सकाळी किनगाव येथील इंदिरानगर वस्तीच्या पुढील चुंचाळे रस्त्यावरील नाल्याच्या पुलाच्या खाली त्यांचा गळा कापलेला अवस्थेत मृतदेह शेतमजुरांना दिसून आला आणि एकच खळबळ उडाली. मजुरांना गावात माहिती दिल्यानंतर यावल पोलिसांना (Yaval Police)  माहिती देण्यात आली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!