यावल (सुरेश पाटील) यावल तहसील कार्यालयापासून,पोलीस स्टेशन पासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर तसेच सर्कल व तलाठी कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर आणि न्यायालयाच्या मागील बाजूस असलेल्या हरिता- सरिता नावाने असलेल्या ( हडकाई- खडकाई) नद्यांमधून अवैध रीत्या वाळू उत्खनन करून सर्रासपणे वाहतूक होत असल्याने नद्यांमध्ये मोठ मोठे खड्डे निर्माण झाले आहेत.हा सर्व प्रकार वरील संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या निदर्शनात येत नाही का? किंवा न्यायालय वगळता इतरांचे वाळू व्यवसायात आर्थिक हितसंबंध आहेत का..? इत्यादी अनेक प्रश्न यावल शहरात उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads1"]
याचप्रमाणे यावल शहराच्या आजूबाजूस असलेल्या उंच टेकड्या जेसीपी मशीन द्वारे सपाटीकरण करून पिवळ्या मातीचा गोरख धंदा डंपर व ट्रॅक्टरच्या माध्यमातून बिनधास्तपणे भर दिवसा व रात्री सर्रासपणे सुसाट वेगाने सुरू आहे,यावल शहरात प्रमुख रस्त्यावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अवैध वाळू व पिवळी माती वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ नोंद होत असून सुद्धा कारवाई होत नसल्याने तसेच पिवळी माती वाहतूक करण्यासाठी परवानगी,परवाना,रॉयल्टी यावल तहसीलकडून मिळाली आहे किंवा नाही हा संशोधनाचा व कार्यालयीन कामकाजाचा विषय आहे.[ads id="ads2"]
उंच टेकड्या सपाटी करण्यासाठी आणि तेथील पिवळी माती वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी व खाजगी उद्योगधंद्यांसाठी महसूलचे काही अटी शर्ती व नियम आहेत याकडे स्थानिक सर्कल तलाठी यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून अवैधरित्या पिवळी माती वाहतूक व वाळू वाहतुकीत ट्रॅक्टर व डंपर चालकांकडून तालुक्यातून शासकीय काही ठराविक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावावर कोणीतरी मासिक 'हप्ते' वसूल करीत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे यामुळे प्रांताधिकारी यांनी आपल्या महसूल विभागामार्फत शासकीय सुटी असलेल्या दिवसासह भरारी पथक नियुक्त करून यावल शहराच्या चारही बाजूने नाकाबंदी करून अवैधरित्या आणि सुसाट वेगाने होणारी पिवळी माती आणि वाळू वाहतूक बंद करावी असे संपूर्ण यावरील शहरासह परिसरात बोलले जात आहे.