यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या धन दाट अभय अरण्यात वृक्ष तोड करणारी टोळी सक्रिय असून वृक्षाची कत्तल करून मुद्देमाल परप्रातांत पाठविण्यात येतो . दिनांक २८ फेबूवारी रोजी वन विभागाच्या धाडसी कार्यवाहीत विना परवाना अवैध तोड केलेल्या लाकुडासह सुमारे चार लाख १६००० रूपये किमत मुद्देमाल व वाहन जप्त करण्यात आले आहे.[ads id="ads1"]
या संदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २८ फेबुवारी रोजी १०वाजेच्या सुमारास यावल फैजपुर मार्गावरील रस्त्यावर महाविद्यालयाच्या काही अंतरावर पुढे पुर्व विभागाचे वनपरिचेत्र अधिकारी विक्रम पदमोर व गस्ती पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगार वनरक्षक यावल भैय्यासाहेब गायकवाड , वनमजुर अशोक माळी हे आपल्या पथकासह गस्तीवर असतांना ट्रक वाहन क्रमांक एमएच १६ , ए ई ९३१७या वाहनातुन संशयीत आरोपी ट्रक वाहन चालक जुम्मा नबाब तडवी राहणार कोरपावली तालुका यावल हा त्याच्या ताब्यातील टाटा आयसर या वाहनातुन विनापरवाना निम पापडी प्रजातीचे १८००० घन मिटर जळाऊ किमत१६००० रूपये व टाटा आयसर ट्रक वाहन किमत चार लाख रुपये असे मुद्देमालासह जप्त करण्यात आले असुन , जुम्मा नबाब तडवी याच्या विरूद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ , महाराष्ट्र वन नियमावली २०१४ अन्वये आगार वनरक्षक यावल यांनी प्र. रि.नं. ०२ / २०२३ दिनांक २८ फेब्रुवारीचा वन गुन्हा नोंदविला आहे.[ads id="ads2"]
या गुन्ह्याचा तपास वनसंरक्षक धुळे ( प्रा ) दिगंबर पगार व सहाय्यक वनसंरक्षक यावल प्रथमेश हाडपे यावल पुर्व वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगर कठोरा वनक्षेत्राचे वनपाल रविद्र तायडे हे तपास करीत आहे . यावल पुर्न वनविभागाच्या अनैद्य वृक्षतोड माफीया विरूद्ध सुरू झालेल्या या मोहीमे वृक्षतोड माफीयामध्ये एकच खळबळ उडाली आहे .