शिवजयंती व विविध सणाच्या पार्श्वभुमीवर यावल पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल ( फिरोज तडवी ) तिथीनुसार येत्या १० मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सह आगामी काळातील सण उत्सव, उत्साहात व शांततेत पार पडावे  तसेच कोणत्याही  धर्माच्या  धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही  याची सर्व धर्मीयांनी आप- आपल्या उत्सवात काळजी घ्यावी आणि , सोशल नेटवर्कद्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी पोलीस ठाण्यात संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले. [ads id="ads1"]  

यावल येथील पोलीस ठाण्यात आगामी १० मार्च शुक्रवार रोजी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) कडून तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती तसेच आगामी काळातील सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सर्व धर्मीय बांधवांची उपस्थिती होती. यात सर्वांनीच आपल्या हातून इतर धर्माच्या धार्मिक भावना दुखावणार नाही यासाठी काळजी घ्यावी तसेच सोशल नेटवर्क द्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज यासंदर्भात पोलिसांना माहिती द्यावी व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केले.[ads id="ads2"]  

   या शांतता समितीच्या बैठकीमध्ये पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे , माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख, हाजी शब्बीर खान ,भाजपा शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, शिवसेनेचे शरद कोळी, संतोष धोबी , पप्पु जोशी, हाजी ताहेर शेख , काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, पवन पाटील, राष्ट्रवादीचे मोहसीन खान, अजहर खाटीक, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, सय्यद युनूस सय्यद युसुफ , हाजी इकबाल खान, शायर हबीब मंजर, हाजी गफ्फार शाह, एम बी तडवी यांच्यासह मोठ्या संख्येत शांतता समिती सदस्य व नागरिकांची उपस्थिती होती.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!