धरणगाव येथे मिटींग मध्ये बौद्ध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा.भरत सिरसाट यांनी साहित्य संमेलनाचा इतिहास उलगडून सांगितला आणि बुध्दांपासून दूर गेलेल्यांचे नुकसान झाले बुद्ध बहुजनांचा आहे, संमेलन विचारांचे असेल,दोनशे साहित्यिकांचा सहभाग राहील, चार महिन्यापासून तयारी सुरु, कथाकथन, परिसंवाद, कविसंमेलन, गझलसंध्या इत्यादी कार्यक्रम जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित केलेल्या संमेलनात साहित्य प्रेमींनी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले.[ads id="ads1"]
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संजिवकुमार सोनवणे,(प्रसिद्ध साहित्यिक) हे होते. त्यांनी समाजाची दशा व दिशा यावर मार्गदर्शन केले. सत्यशोधक डी एम मोतीराळेसर यांनी समतेवर आधारित आणि बौद्धांच्या विचार सरणी प्रमाणे समाज व्यवस्था निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी प्रा बी एन चौधरी (कवी व व्यंगचित्रकार) यांनी साहित्य संमेलनाचे महत्त्व सांगितले. [ads id="ads2"]
कार्यक्रम आयोजनात दिपक वाघमारे, राजेंद्र बागुल,गोवर्धन सोनवणे, दिक्षाताई गायकवाड,महादू अहिरे, पी डी पाटील, लक्ष्मण पाटील,राजेंद्र गायकवाड, विजय गाढे,सुवालाल मोरे, शांताराम मोरे,सिरसाट गुरुजी, प्रा सपकाळ सर,हिम्मत भालेराव, प्रल्हाद सुर्यवंशी,सविता गाढे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन कैलास पवारसर यांनी केले. आभार प्रदर्शन सुधाकर मोरेसर यांनी केले.


