फैजपूर ता.यावल प्रतिनिधी (सलीम पिंजारी)
दि २७ रोजी राज्य शासनाच्या विद्यमाने "मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने"मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक तथा निवृत्त विक्रीकर सहाय्यक आयुक्त व महाराष्ट्र राज्य अनु. जाती,जमाती आयोगाचे सदस्य सचिव किशोर मेढे यांच्या"दलित भारत"(वैचारिक )ग्रंथास राज्य सरकारच्या साहित्य आणि संस्कृती विभागाच्या वतीने एक लाख रुपये व सन्मान पत्र देऊन ना.दिपक केसरकर व विधानसभा अध्यक्ष ना.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.[ads id="ads1"]
दरम्यान खानदेशातील आंबेडकरी चळवळीचा वैचारिक वारसा लाभलेल्या कुटूंबातून किशोरजी मेढे सर्वांचे परिचित विद्यार्थी प्रिय सर म्हणून प्रख्यात आहे.प्रा.किशोर मेढे यांची सुरुवातीस प्राध्यापक म्हणून धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर येथे सन १९८६ ते १९९२ पर्यंत कार्यरत होते.त्यानंतर १९९२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत विक्रीकर अधिकारी वर्ग १ या पदावर नियुक्त झाले. सन २००१ मध्ये विक्रीकर उपायुक्त पदाचे पदोन्नती झाल्यानंतर सहआयुक्त झाले.महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगातील सदस्य सचिव म्हणून कामगिरी प्रशंसनीय आहे.महाराष्ट्रातील विविध कार्यालयांना भेटी देऊन मागासवर्गीयांचे आरक्षण तपासून अनुशेष भरण्यासाठी प्रयत्न केले.[ads id="ads2"]
आयोगाला वैधानिक दर्जा मिळावा यासाठी 'स्वतंत्र कायदा' करून शासन दरबारी पाठपुरावा केला.तसेच किशोर मेढे यांना लेखनाची सुद्धा खूप आवड असून 'अस्तित्वाचे आकाश'हा कवितासंग्रह तसेच 'दर्पण' हा अनुवादित कविता संग्रह २०१२ मध्ये प्रकाशित झाला.तसेच 'इमरोज'यात गुलदार जावेद अख्तर, निर्मला पुतुल यांच्या हिंदी-इंग्रजी कवितांचा अनुवाद आहे. 'इमरोज' यांच्या ' जशन जारी हैं' या हिंदी कवितांचा मराठीत अनुवाद आहे.या कवितांचा मराठीत अनुवादास राज्यस्तरीय २०१२-१३ या बाह्यकवी पुरस्कार प्राप्त झाला.दरम्यान सध्या ते महाराष्ट्र राज्य अनु. जाती,जमाती आयोगाचे सदस्य सचिव पदावर कार्यरत आहे.किशोर मेढे साहेब यांचा झालेल्या सन्मानाने त्यांचे अभिनंदन होत आहे.