ऐनपूर ता. रावेर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील टी.वाय.बी.एससी वर्गाची विद्यार्थिनी प्रियंका कैलास तायडे हीची पावर लिफ्टिंग या खेळात कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या संघात निवड करण्यात आली आहे.[ads id="ads1"]
सदर आंतरविद्यापीठ पावर लिफ्टिंग महिला स्पर्धा हिमाचल प्रदेश केंद्रीय विद्यापीठ ,धर्मशाला येथे दि.०९ मार्च २०२३ ते १२ मार्च २०२३ या दरम्यान होणार आहेत.अांतरविद्यापीठ पावर लिफ्टिंग महिला संघात निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.भागवत विश्वनाथ पाटील, चेअरमन श्रीराम पाटील, संस्थेचे सेक्रेटरी संजय पाटील सर्व संचालक मंडळ, [ads id="ads2"] प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.सचिन.एन.झोपे , डॉ.के.जी.कोल्हे , प्रा.एस आर इंगळे, डॉ.पी.आर.गवळी व श्री.गोपाळ महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कु.प्रिंयका कैलास तायडे हिला डॉ.सचिन झोपे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांचे मार्गदर्शन लाभले. व पुढील होणाऱ्या आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा:- मुक बधीर महिलेचे वारसाचा शोध होण्यास जळगाव पोलसांकडून जनतेला आवाहन
हेही वाचा:-रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी नग्नावस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ
हेही वाचा:- निंभोरा पोलिसात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जामीन मंजूर