सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
"तसेच अक्षय तृतीया निमित्त श्री स्वामीनारायण मंदिरात मंदिराची कोठारी शास्त्री भक्ती किशोरदास यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विधि अन्वे शहरातील हिंदू बांधवांनी सामूहिकपणे आपले पूर्वज सह,शहीद झालेले सैनिक व कोरोना काळात मृत्यू झालेल्यांच्या नावाने एकच वेळी तब्बल ३०० घागरी भरल्या. यावेळी घागरींवर गव्हार, आंब्याची पाने,फुल,पितृशांती यज्ञ पुजनाचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला.दोन सामाजाचे सण अनेकदा एकच दिवशी येवून मानव जातीला संदेश देतात की चुकीच्या गोष्टी वसरुन सर्वांनी गुण्या गोविंदाने राहुत जातिय सलोखा टिकून ठेवावे.तरी याचा सर्वांनी बोध घेणे आवश्यक आहे.[ads id="ads1"]
सावदा येथे सालाबादप्रमाणे दि.२२ एप्रिल रोजी शनिवारी रमजान ईदचा उत्साह होता.तरी शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी पिंपरी रोड वरील असलेल्या ईदगाह मैदानावर सकाळी ८-३० वाजता सामूहिकपणे जवळपास ४ हजारांच्यावर मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे येत ईदची नमाज पठण केली.यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी पोलिस प्रशासनातर्फे सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे,पीएसआय अन्वर तडवी,उमेश पाटील,यशवंत टहाकळे,देवेंद्र पाटील,पोलिस हेड कॉ.सपकाळे यांनी पुष्पगुच्छ देऊन मुस्लिम बांधवांचे स्वागत केले.[ads id="ads2"]
राष्ट्रवादीतर्फे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे,माजी नगरसेवक अजय भारंबे,कुशल जावळे,पंकज येवले,सैय्यद अजगर,शहर शिवसेना(ठाकरे गट)चे,भरत,धनंजय चौधरी, नेहेते,इरफान मियां,भाजपतर्फे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,श्याम पाटील,प्रवीण पाटील,पत्रकार फरिद शेख,युसूफ शाह,साजीद शेख सह शौकत खान मुराद तडवी,माजी नगरसेवक फिरोज खान पठाण,शेरखा तडवी,फिरोज लेप्टी,अजमल खान उपस्थित होते.
हेही वाचा :- वादळाच्या तडाख्याने विजतारा पडल्याने दोन बैल दगावले व शेतकरी गंभीर जखमी ; रावेर तालुक्यातील घटना
हेही वाचा :- रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे बारा गाड्यांखाली येऊन एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी
हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश
हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर : जनधन बँक खाते असेल तर मिळणार "इतके" रुपये
हेही वाचा:- 60 वर्षीय वृद्धास लक्झरीने चिरडले ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना
याप्रसंगी संपूर्ण ईदगा मैदानाच्या अवतीभवती व शहरात लवकरच नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करून आपली कर्तव्यदक्षता पार पाणारे एपीआय जालींदर पळे यांनी स्वतःजातीने लक्ष घालून सदर दिवशी चौक बंदोबस्त ठेवला होता.