भुसावळ (फिरोज तडवी)
जळगांव जिल्ह्यातील भुसावळ येथील वेलनेस फॉरेव्हर केमिस्ट अँड लाइफस्टाईल स्टोअर तसेच छत्रपती शाहूमहाराज बॉक्सिंग ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ येथील पांडुरंग टॉकीज च्या मागे,श्री वेंकटेश बालाजी मंदिराच्या समोर, टिंबर मार्केट, अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिर,मोफत आरोग्य तपासणी शिबिर ,मोफत रक्त तपासणी शिबिर, तसेच मोफत व्यसनमुक्ती तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे ,आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ येथील पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड साहेब , उपस्थित होते.[ads id="ads1"]
आर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉ. वंदना वाकचौरे, छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी चे अध्यक्ष संदीप राठोड व बाळा मोरे, दीपक नाटेकर तसेच विजय फिरके , डॉ. वंदना गवळी तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी राहुल गायकवाड यांनी उपस्थितांना रक्तदानासाठी प्रवृत्त केले.[ads id="ads2"]
तसेच कार्यक्रमात 26-जानेवारी-२०२३रोजी बडौदा येथे सलग ८५ तासात १२०० किमी सायकलींग बडौदा ते सातारा खंबाटकी घाट व परत सातारा ते बडौदा. यशस्वीरित्या हा प्रवास सायकलने केल्याबद्दल विजय फिरके यांचा शाल पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,
शिबिरामध्ये डॉ वंदना गवळी व डॉ वंदना वाकचौरे यांनी आरोग्य तपासणी केली तसेच
1)Blood sugar Randam
2)CBC
3)TSH
4)Sr.Calcium
5)Sr.Cholesterol
या तपासण्या वेलनेस फॉरएव्हर केमिस्ट व लाइफ स्टोअर मार्फत लुपिन डायग्नोस्टिक लॅब तर्फे मोफत केल्या गेल्या, त्याचप्रमाणे नेत्रम हॉस्पिटलच्या वतीने सुनील मेश्राम यांनी डोळ्यांची मोफत तपासणी केली , छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमीच्या ग्रुपने रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले, याप्रसंगी जवळपास 25 बॅग रक्त रवींद्र सूर्यवंशी व महादेव मुळे संचालक रेड प्लस ब्लड बँक यांनी रक्त संकलित केले आणि नवजीवन हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून उपस्थित युवा वर्गाला व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन करण्यात आले,शिबिराचा जवळपास 175 लोकांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरकणी महिला मंचच्या सदस्या सौ संगीता बोलके यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या वाईस प्रिन्सिपल श्रीमती रजनी बडगुजर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्ययन कॉलेज अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजचा संपूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन स्टाफ हिरकणी महिला मंच सदस्य परिवार बॉक्सिंग अकॅडमी संपूर्ण ग्रुप तसेच आशा पाटील मॅडम जया इंगळे मॅडम आणि प्रवीण कारवाडे प्रशांत सावंत हेमंत लोहार प्रजावती तायडे कविता जाधव नकुल ठोसर विनीत दवंगे प्रियंका लोणारी रीना पारधे यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.