सदर सत्कार समारंभ हा मराठी विभागातर्फे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रेखा प्रमोद पाटील यांनी आयोजित केला. याप्रसंगी मराठी विभागातर्फे प्रा. डॉ. महेंद्र सोनवणे यांनी पीएच. डी. प्राप्त केल्याबद्दल त्यांचा मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रेखा प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. [ads id="ads2"]
प्रा.डॉ.महेंद्र सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून प्रेमानंद गज्वी यांच्या किरवंत, जय जय रघुवीर समर्थ, शुध्दबीजापोटी इत्यादी नाटकांविषयी विषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी प्रा. डॉ. विनोद रामटेके, प्रा. डॉ. पी. आर. गवळी, प्रा. एस. पी. उमरीवाड, प्रा. नरेंद्र मुळे, प्रा. अक्षय महाजन असे सर्व मान्यवर प्राध्यापक मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते. हर्षल पाटील आणि श्रेयस पाटील या प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नरेंद्र मुळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रेखा प्रमोद पाटील यांनी केले, प्रेमानंद गज्वी हे मराठी साहित्यातील एक सुप्रसिद्ध असे दलित साहित्यिक आहेत त्यांचा परिचय प्रत्येकाला असायलाच हवा असे प्रास्ताविकातून प्रा.डॉ रेखा पाटील यांनी सांगितले. प्रा. अक्षय महाजन यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.


