यावल तालुक्यातील अट्रावल येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना ; गावात तणावपूर्ण शांतता

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) यावल तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना झाल्यानंतर तणावाचे वातावरण निर्मित झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे.[ads id="ads1"]  

सविस्तर  वृत्त असे की, यावल तालुक्यातील मोठे व महत्वाचे गाव असलेल्या  अट्रावल (Atrawal Taluka Yawal)  या गावात आज पहाटे महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुमारे दहा-बारा जणांच्या जमावाने पहाटे सव्वासहा वाजेच्या सुमारास हा प्रकार केला. त्यांनी पहिल्यांदा येथील पथदिवा फोडून नंतर पुतळ्याची तोडफोड केली. हा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या जमावाने या ग्रामस्थांना मारहाण करत पलायन केले.[ads id="ads2"]  

काही मिनिटांमध्येच ही वार्ता परिसरात पसरताच दोन गटांमध्ये दगडफेकीसह तुफान हाणामारी झाली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तथापि, अतिरिक्त कुमक मागविण्यात आल्याने लवकरच वातावरण नियंत्रणात आले.

अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरिक्षक राकेश मानेगावकर आणि त्यांचे सहकारी अट्रावलमध्ये ठाण मांडून बसले असून दोन्ही गटांशी सुसंवाद साधत आहेत. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून रॅपीड ऍक्शन फोर्ससह अतिरिक्त कुमक मागविण्यात आली असून गावात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

पोलीस प्रशासनाने या संदर्भात येथे वातावरण नियंत्रणात असल्याचे सांगून कुणीही या प्रकरणाच्या बाबत अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे. आज अट्रावलमध्ये जो प्रकार घडला, त्यातील दोषींवर कारवाई करण्यात येत असून याबाबत कुणी सोशल मीडियात दिशाभूल करणारी माहिती प्रसारीत करू नये असेही पोलीस प्रशासनाने सांगितले आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!