ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील जिल्हा परिषद निधी अंतर्गत सन २०२०/२१ मंजूर खोलीचे बांधकाम जवळ जवळ पूर्ण होत आलेले असून सदर खोलीचा वापर अद्यापही होत नसून ताबा पावती अभावी ती खोली निव्वळ शो पीस ठरत आहे.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील जि.प.उर्दू शाळा येथे इयत्ता पहिली ते सातवी असे वर्ग असून प्रत्येक्षात २ ते ३ वर्गात अध्यापन केले जात आहे त्यासाठी जिल्हा परिषद निधी अंतर्गत सन २०२०/२१ मध्ये एक वर्ग खोली मंजूर करण्यात आली होती ते मंजूर बांधकाम पूर्ण होऊन सुद्धा अध्यापनासाठी त्या खोलीचा वापर होताना दिसत नाही अध्यापनासाठी खूप अडचण व आवश्यकता असल्यावर सुध्दा सदर खोलीचा वापर का होत नाही? असा प्रश्न पालकांना पडत आहे.[ads id="ads2"]
एवढा कालावधी गेल्यावर काम पूर्ण झाले किंवा नाही जर झाले असेल तर हॅण्ड ओवर किंवा ताबा पावतीची प्रोसेस झाली नाही का?जर केली असेल तर ग्रामपंचायत किंवा शाळा व्यवस्थापन समिती यांनी खोली बाबत अंमलबजावणी केली अथवा नाही ? सदर कामाबाबत बांधकाम वर्ष सुध्दा वर्ग खोलीवर टाकलेले नसून संभ्रम निर्माण होत आहे तसेच काम पूर्ण झाले किंवा नाही याबाबत शंका निर्माण होत आहे.
हेही वाचा:- रावेर तालुक्यातील " या" गावातील अनोळखी व्यक्तीचा खून; रावेर तालुक्यात खळबळ
तसेच वर्गखोली अध्यापनासाठीच आहे की शो पीस म्हणून ठेवले आहे अशी चर्चा पालकवर्गात जोरात सुरू आहे
या दिरंगाई ला जबाबदार कोण? शासन,प्रशासन, ठेकेदार का व्यवस्थापन समिती?
शासनाने मंजूर करुन दिलेला निधी हा नुसता शो पीस साठी खर्च करायचे प्रयोजन तर नाही ना? तरी सदर मंजूर वर्ग खोली चा वापर नेमका कशासाठी करणार आहेत शो पीस का अध्यापनासाठी असा प्रश्न निर्माण होत आहे
प्रतिक्रिया
१) अमोल महाजन ( सरपंच ऐनपुर )
आमच्याकडे ताबा पावती अद्याप मिळालेली नाही फळा व इलेक्ट्रिक फिटींग ,रॅम्प नसल्याने तसेच ताबा पावती मिळाली नसल्याने वर्ग खोली चा वापर करता येणार नाही.
२) उमेश महाजन ( कंत्राटदार ) सदर खोलीचे कंत्राट मला मिळाले होते परंतु मी व ठेकेदार विजय पाटील आम्ही काम आपसात अदलाबदल केले होते म्हणून सदर खोलीचे काम दुसऱ्याकडे होते माझ्या माहितीप्रमाणे कामांचे बिल निघाले आहे तसेच काम पूर्ण झाल्याने व कामांचे बिल निघाल्या नंतर हॅण्ड ओवर प्रकार नसतो काम बिला प्रमाणे झाले आहे पुढील जे काही काम असेल ते ग्रामपंचायत कडून करता येईल.
३)एस. एम. पाटील ( अभियंता ) उर्दू शाळा वर्ग खोली चे बांधकाम पूर्ण झाले आहे२०२०/२१ मध्ये बांधकाम मंजूर होते कामांचे बिल तीन टप्प्यांत झाले असून शेवटचे बिल निघाले अथवा नाही ते विचारुन घेतो काम पुर्ण झाल्यानंतर शाळेस हॅण्ड ओवर करायला पाहिजे तरी मी सदर बाबतीत शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारतो.