ऐनपूर महाविद्यालयात पदवी काळात एम.पी. एस.सी. / यु.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी? या विषयावर मार्गदर्शन संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 
रावेर तालुका प्रतिनिधि- विनोद हरी कोळी                        ऐनपूर: येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अंतर्गत गुणवत्ता हमी समिती  आणि द युनिक अकॅडमी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यासाठी “पदवी काळात एम.पी. एस.सी. / यु.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी? ” या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरवातीला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

व्यासपीठावर श्री. नरेन्द्र पाटील, श्री. विकास गिरासे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, प्रा. हेमंत बाविस्कर डॉ. सतीश वैष्णव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. सतीश एन. वैष्णव यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. विकास गिरासे, शाखा प्रमुख द युनिक अकॅडमी जळगाव, यांनी आपल्या मार्गदर्शनात राज्य व केंद्र शासना तर्फे स्पर्धा परीक्षांमार्फत भरल्या जाणाऱ्या विविध पदांची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी. / यु.पी.एस.सी. परीक्षेचे बदललेले स्वरूप, गुणांची विभागणी, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, वयाची अट,  पूर्व आणि मुख्य परीक्षेत झालेले बदल समजावून सांगितले. विद्यार्थ्यानी एम.पी. एस.सी. / यु.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना पाठ्यपुस्तक, संदर्भ ग्रंथ, वृत्तपत्र, नियतकालिक यांचे वाचन आणि प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडवण्याचा सराव ही यशाची पंचसूत्री विषद केली. प्रश्नोत्तराच्या सत्रात विद्यार्थ्यानि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबद्दल जागृती निर्माण व्हावी त्यात ते यशस्वी व्हावेत यासाठी सदर केंद्र महाविद्यालयात कार्यरत आहे असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतीश एन. वैष्णव यांनी तर आभार डॉ. संदीप एस. साळुंके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एच एम. बाविस्कर, प्रा. केतन बारी, डॉ. संदीप एस. साळुंके, डॉ. सतीश एन. वैष्णव आणि सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!