रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील विवरे बु येथे सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे लोक उघड्यावर मोकळया जागेत किंवा रस्त्यावर जातात असे असून दिसुन सुध्दा ग्रामपंचायत प्रशासनाने या गावातील लोकांना पुरूषांसाठी कोणतेही प्रकारची गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी शौचालय योजना राबविण्यात आलेली नाही.[ads id="ads1"]
तरी हागणदारी मुक्त नसलेल्या गावाला हागणदारी मुक्त असे म्हणून कागदोपत्री करून घेऊन व फळी लावून हागणदारी मुक्त गाव झालेले नाही तरी जनसामान्य नागरिकांना असा प्रश्न निर्माण झालेला आहे विवरे बु येथे सार्वजनिक शौचालय नसल्याने रावेर रोड सावदा रोड व ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नाही ' किंवा ' देणार का ? सार्वजनिक हितासाठी लोकांच्या सोयीसाठी वार्ड क्रमांक पाच येथे सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात येईल का ? किंवा कुठेतरी व्यवस्था करण्यात येईल का आज पर्यंत ग्रामपंचायत प्रशासनाने पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालयाचे कोणतेही प्रकारची उभारणी केलेली नाही.[ads id="ads2"]
तसेच वार्ड क्रमांक पाच येथे कोणत्याही प्रकारची स्वच्छतेबाबतची अंमलबजावणी केलेली नाही असे असून गावातील प्रदुषण रोगराईला आळा बसावा म्हणून विवरे बु ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील लोकांसाठी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी अशी उपाययोजना राबवण्यात यावी जेणेकरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी ग्रामपंचायत प्रशासनाने घ्यावी अशी चर्चा सुरू आहे.


