सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून पदार्थ विज्ञान विभागाचे प्रा. डॉ. के. जी. कोल्हे आणि प्रा. डॉ. निता वाणी हे होते.
प्रा. डॉ. के. जी. कोल्हे यांनी आपल्या व्याख्यानात महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाची स्थापना आणि त्या मागील म. फुले यांचे तत्वज्ञान तसेच शेतकऱ्यांचे तत्कालीन समस्या व सध्याचे परिस्थिती याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.[ads id="ads2"]
प्रा. डॉ निता वाणी यांनी आपले विचार मांडताना असे म्हटले की, म.फुले यांनी स्त्री शिक्षण दिल्यामुळे आजचे परिवर्तन घडून आले आहे. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. मुलींना उच्च शिक्षण घेऊन पुढील प्रगती साधता येईल, आपले स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आणि जवळचे उत्कृष्ट साधन आहे असे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.जे.बी. अंजने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे म्हटले की, म.फुले यांचे विचार आपल्या जीवनात आचरण करावे, म.फुले यांचे शिक्षण विषयक कार्यांची माहिती व स्त्री- पुरुष समानता याविषयी मार्गदर्शन केले. 'महात्मा' या शब्दाचे अर्थ तसेच फुले यांचे हंटर आयोगापुढील साक्ष, सक्तीचे आणि मोफत शिक्षण, छ. शिवाजी महाराज यांच्या जिवनावर प्रथम पोवाडा व जयंती साजरी केली असे विचार विद्यार्थ्यांना सांगितले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन आणि सुत्रसंचलन समान संधी केंद्रांचे समन्वयक प्रा. एस. पी.उमरीवाड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. एस. एन. वैष्णव यांनी मानले. या कार्यक्रमात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. रेखा पी. पाटील, डॉ. एस.एन. वैष्णव, प्रा. व्ही. एच. पाटील, डॉ.पी.आर.गवळी, प्रा. डॉ. जे. पी. नेहेते, प्रा. डॉ.प्रदिप तायडे, डॉ. नरेंद्र मुळे, प्रा. डॉ. पी. आर. महाजन, प्रा. डॉ. संदीप साळुंके, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, प्रा. अक्षय महाजन, श्री श्रेयश पाटील , श्री भास्कर पाटील, जयेश बढे यांनी परिश्रम घेतले.