सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. रेखा पी.पाटील हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एस.ए. पाटील हे होते.[ads id="ads1"]
प्रा. डॉ.एस.ए. पाटील यांनी 'नशामुक्ती' - 'सक्षम भारत आणि सुदृढ युवा' या विषयावर आपले विचार व्यक्त करताना असे म्हटले की, येणारी भावी पिढी सुदृढ आणि निरोगी व सक्षम राहण्यासाठी व्यसना पासून दूर राहिले पाहिजे आहार,विहार आणि विचार शुध्द कसे ठेवावे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच व्यसनाधीनता आणि जीवघेणी व्याधी त्यातून निर्माण होणारे विविध सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक समस्या याकडे सभेचे लक्ष वेधले, आपण युवा अनेक क्षेत्रांत प्रगती करत आहोत आणि प्रगतीची ही वाटचाल कायम राखण्यासाठी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी दिनचर्येकडे लक्ष द्यावे आणि मोबाईल पासून दूर राहण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.[ads id="ads2"]
उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी, देशासाठी नशा मुक्तीचे मूल्य व्यक्तिगत पातळीवर रुजविण्यासाठी कुटुंब, समाज, शाळा आणि महाविद्यालयांची जबाबदारी आहे. तसेच अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना नशा मुक्तीचे महत्व पटवून दिले.
हेही वाचा:- रावेर तालुक्यातील " या" गावातील अनोळखी व्यक्तीचा खून; रावेर तालुक्यात खळबळ
अध्यक्षीय भाषणात डॉ. रेखा पी. पाटील यांनी असे म्हटले की, व्यसनाधीनते पासून व्यक्ती ने दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, स्वताला कार्यमग्न ठेवावे, चांगले छंद जोपासा, ध्येय वेडे व्हा!, वेळेला महत्व द्यावे असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन आणि सुत्रसंचलन समान संधी केंद्रांचे समन्वयक प्रा. एस. पी.उमरीवाड यांनी केले. प्रा. उमरीवाड यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, विद्यापीठ परीक्षांच्या तयारीसाठी आवाहन केले आहे, मास्क वापरावे इ. माहितीपर सूचना दिले. कार्यक्रमाचे आभार प्रा. अक्षय महाजन यांनी मानले. या कार्यक्रमात ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. निता वाणी, डॉ. एस.एन. वैष्णव, प्रा. व्ही. एच. पाटील, डॉ.पी.आर.गवळी, प्रा. जे. पी. नेहेते, प्रा. प्रदिप तायडे, प्रा. अक्षय महाजन, श्री श्रेयश पाटील , श्री भास्कर पाटील यांनी परिश्रम घेतले.