रावेर (विनोद हरी कोळी) ऐनपूर येथील स. व. प. कला व विज्ञान महाविद्यालयात गणित विभागामार्फत बौद्धिक क्षमता चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा ही चार टप्प्यात पार पडली. [ads id="ads1"]
प्रथम फेरीत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी देण्यात आली. प्रथम फेरीतून अकरा विद्यार्थ्यांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली असून, दुसऱ्या फेरीतून सहा विद्यार्थ्यांची निवड तिसऱ्या फेरीसाठी झाली व चौथ्या व अंतिम फेरीसाठी तीन विद्यार्थी हे पात्र झाले. चौथी व अंतिम फेरी दि 6-4-2023 रोजी पार पडली असून [ads id="ads2"] यात विजेते पुढील प्रमाणे
प्रथम: अलताब युसूफ पटेल
द्वितीय: ललित कडु पाटील
तृतीय: प्रितेश अशोक कोळी.
सदर परीक्षा गणित विभागाचे विभागप्रमुख प्रा. एस. बी. महाजन सर यांच्याद्वारे राबविली गेली असून सरांनी स्पर्धेचे आयोजन अगदी नाविन्यपूर्ण, पारदर्शक व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण अशा प्रकारे केले. स्पर्धा ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.