रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलांची फसवणुक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


विवरे ता.रावेर (संजय मानकरे) 

रावेर तालुव्यातील विवरे बु ॥ येथील उटखेडा रोडावरील सरदार वल्लभाई पटेल नगरात येथे दागि ने पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी इसमांनी महिलांचे  दोन तोळे दागीने पसार केल्याने विवरे बुदुक गावात एकच खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"]  

   ही घटना रविवारी सकाळी ९.३०  वाजता घटली येथील महिला घराबाहेर एकटीच बसलेली पाहुन दोन तरुण त्यांच्याकडे आले आम्ही दागीने पॉलिश करून देतो असे सांगुन महिलेला अंगावरून दागिने काढण्यास दोन इसमानी सांगितले यानंतर सुशिला मधुकर राणे यांनी मंगळसुत्र व कानातील दागीने व देवयानी यशवंत राणे यांच्या कानातील दागिने पातेल्यात टाकण्यास सांगुन महिलांची नजर चुकवून सर्व दागिने काढून ही दोन्ही अनोळखी व्यक्ती पसार झाले.[ads id="ads2"]  

   महिला पातेल्यात दागिने काढण्यास गेले असता. त्यात दागिने नसल्याने महिलेच्या लक्षात आले की आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच सदर महिलांनी आरडा ओरडा केली . मात्र तो पर्यंत दोघे चोरांनी पळ काढून पलायन केले. या घटनेने विवरे गावात खळबळ उडाली आहे .

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!