नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी रविवारी सायंकाळच्या सुमारास नांदगाव शहरासह नांदगाव तालुक्यात वारेमाप पावसाचे आगमन झाले. या बे मोसमी पावसाने पावसाच्या थेंबा सोबत गारा आणि वारा असल्याने या वारेमात पावसाने शेती पिकांची आठवण नुकसान झाले असून विशेषतः करून फळ पिकांचे नुकसान आधुनिक झाले आहे.[ads id="ads1"]
रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी सायंकाळच्या सुमारास सुरुवातीला ढगांचा व विजांचा कडकडाट आणि पावसाचा मोठा थेंब त्यासोबत गारा आणि प्रचंड वारा यामुळे नांदगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले. तसेच गारा आणि वाऱ्यामुळे द्राक्षे, आंबा, पपई, पेरू केळी आदी फळे आदी पिकांना झोडपून काढले. अशा या वादळ वाऱ्याने अर्धा तास नुसते थैमान घातली होते. [ads id="ads2"]
सततच्या बेमोसमी पावसाच्या अस्मानी पणामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे. वादळ एवढ्या प्रचंड स्वरूपात होते की, रस्त्याने चालणाऱ्या चार चाकी लहान मोठ्या वाहनांची गती देखील कमी झाली होती. तर काही वाहने रस्त्यावर उभी झाली होती. शिवाय झाडांच्या फांद्या तर अक्षरशः जमिनीला टेकत होत्या. आंब्याच्या झाडाखाली कैऱ्यांचा पठारा पडला होता. हा पाऊस सुरू असताना प्रचंड दहशत निर्माण करीत होता.
तसेच नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील बोलठाण, जातेगाव येथे सुसाट वाऱ्यांचा आवाजासह गारांचा पाऊस पडून शेतीच्या पिकांचे नुकसान झाले. मौजे रोहिले बुद्रुक येथे जरी गारांचा पाऊस झाला नाही तरी वारा इतका सुसाट होता की घरावरील पत्रे उडण्याच्या मार्गावर होते.