सावदा प्रतिनिधी/युसूफ शाह
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर सावदा पोलिस स्टेशन च्या वतीने रविवारी दिनांक ०९/४/२०२३ शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी विविध सूचना केल्या.[ads id="ads1"]
कायदा व सुव्यवस्था राखण्याचे शांतता समितीचे आवाहन
सावदा पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी जालिंदर पळे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पो.स्टे परिसरातील जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, सरपंच, ग्रा. प सदस्य ,पोलीस मित्र, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होवू नये, कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता काय खबरदारी घ्यावी याचे मार्गदर्शन मा. अनोमदर्शी तायडे सर यांनी यावेळी केले. [ads id="ads2"]
पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. उत्सव काळात कोणीही आक्षेपार्ह पोस्टरर्स लावणार नाही. घोषणा देणार नाही, अशा सूचना ही त्यांनी केल्या.सावदाशहर व तालुक्यातील गावातील सामाजिक सलोख्याची भावना कायम राहून धार्मिक एकोपा टिकावा याकरीता सर्व धर्मियांनी सहकार्य करावे. डॉ. आंबेडकर यांचे आदर्श विचार लोकांनी अंगीकारावे अशी उपस्थितांना माहिती दिली. प्रसंगी संजय भालेराव सर, यांनी ही शहराची सामाजिक एकोप्याची परंपरा यापुढेही टिकवून ठेवून येणारे सर्व राष्ट्रीय सण एकात्मतेच्या भावनेतून व शांततेत पार पाडतील यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सभेला सावदा पोलीस हद्दीतील जयंती मंडळाचे सदस्य, पोलीस मित्र आणि पोलीस पाटील आदी उपस्थित होते.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती सर्व समाजबांधव मोठ्या उत्साहात साजरी करतात. यानिमित्त ठिकठिकाणी मिरवणुकीचे आयोजन केले जाते. या महत्वपूर्ण दिवसाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी सावदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जालिंदर पळे यांनी सर्व पोलीस पाटलांना आवश्यक त्या सूचना केल्या तसेच सर्व ठिकाणी निघणाऱ्या मिरवणुकी शांततेत निघेल. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे सांगितले. या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.