भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सायकलीवरून घराकडे निघालेल्या वयोवृद्धास भरधाव लक्झरीने चिरडल्याची संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यातील तळवेल (Talvel) शिवारातील हॉटेल आमंत्रणसमोर (Hotal Amantran) रविवारी घडली.[ads id="ads1"]
अपघातानंतर बेपर्वा लक्झरीचालक (Luxury Driver) पसार झाला मात्र नशिराबादजवळील टोल नाक्यावर (Nashirabad Tol Naka) नशिराबाद पोलिसांनी (Nashirabad Police) चालकाच्या मुसक्या बांधल्या. लक्झरीने चिरडल्याने सुकलाल शेनफडू वाघ वय - 60, रा.तळवेल ता.भुसावळ) यांचा जागीच मृत्यू झाला तर लक्झरी चालक शुभम श्रीराम पाटील (रा.दापोरा, ता.शहापूर जिल्हा - बऱ्हाणपूर) यास गुन्हा दाखल होताच अटक करण्यात आला.[ads id="ads2"]
भरधाव लक्झरीने उडवताच वृद्धाचा मृत्यू
सुकलाल शेनफडू वाघ (वय - 60, रा.तळवेल ता.भुसावळ) हे रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सायकलीने राष्ट्रीय महामार्गावरून(नॅशनल High Way) घराकडे निघाले असता तळवेल शिवारातील हॉटेल आमंत्रणसमोर भरधाव लक्झरी (एम.पी.68 पी.2777) ने वाघ यांना धडक दिल्यानंतर काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेहाची अवस्था अत्यंत छिन्नविच्छीन्न झाली होती. अपघातानंतर बेपर्वा लक्झरी चालकाने सुसाट वेगाने लक्झरी जळगावच्या दिशेने दामटली तर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वरणगाव पोलिसांना (Varangaon Police)नशिराबाद पोलिसांना सूचित केल्यानंतर नशिराबाद टोल नाक्यावर लक्झरी ताब्यात घेण्यात आली तसेच चालकाला पोलीस ठाण्यात (Police Station) आणण्यात आले.