दीपनगर ता.भुसावळ (सुमित निकम) गेल्या अनेक दिवसांपासून हनुमान नगर येथील विजेचा खांब पळावू स्थितीत झाला असुन देखील अद्यापही या खाबाकडे महावितरण कर्मचाऱ्यांची व अधिकाऱी कोणीही लक्ष देण्यास तयार नाही भुसावळातील प्रभाक क्रमांक २० हनुमाननगरातील मोठा हनुमान मंदिर व वारके चाळ येथील नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील आतापर्यंत तक्रारीची कुठलीही दखल महावितरण कडुन घेतली जात नसल्याने अधिकारी विषयी संताप व्यक्त करण्यात आला आहे.[ads id="ads2"]
खांब पडून काही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण ? यास खांबाच्या शेजारी गल्लीतील लहान मुले रात्रीच्या वेळेस खेळत असतात हा खांब पडून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही वारा असल्यास हा खाब मोठ्या प्रमाणात हलत असतो त्यामुळे या खांबाची लवकरात लवकर दुरुस्ती करून हनुमान नगरातील होणारा अनर्थ टाळावा अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.