धमनार वि.का. सोसायटीच्या संचालकांचा सत्कार संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
धमनार वि.का. सोसायटीच्या संचालकांचा सत्कार संपन्न

   साक्री जि.धुळे (अकील  सादिक शहा)  धमनार ता. साक्री जि. धुळे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामविकास पॅनलने वर्चस्व  मिळवत संपूर्ण 13 जागांवर विजय मिळवला त्याबद्दल धुळे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती श्री. जिभाऊसो. हर्षवर्धन दहिते यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित संचालकांचा साक्री येथे सत्कार करण्यात आला.[ads id="ads1"]  

   याप्रसंगी नानासाहेब सोनवणे, अनिल वाघ, ज्ञानेश्वर बच्छाव, दगा काकुळते, सखाराम कारंडा, भीमराव देसले, विनायक पाटील, अनिल बाबूलाल वाघ, कालिदास सोनवणे, संभाजी सोनवणे, हेमंत सोनवणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गटनेते दिनेश सोनवणे, माजी सरपंच एस.आर.सोनवणे, बंडू खैरनार व ग्रामस्थ उपस्थित होते. [ads id="ads2"]  

  यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे, माजी उपसभापती प्रा.रवींद्र ठाकरे, महिर चे सरपंच रमेशभाऊ सरक, भाजपचे तालुका सरचिटणीस प्रदीपकुमार नांद्रे, आष्टाणे विकासो चे संचालक प्रवीण देवरे यांनी देखील नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!