दिनांक 29 मार्च 2023 रोजी मंगळवारी ग्रामसभेची बातमी कव्हर करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी पत्रकार संतोष विधाते यांना बोलावले असता तेथील इसम नामे अशोक धोंडू चंद्रे आणि राजेंद्र पांडुरंग चंद्रे यांनी पत्रकार संतोष विधाते यांना व्हिडिओ काढण्यासाठी विरोध केला. व चक्क अशोक धोंडू चंद्रे यांच्या अंगावर धावून गेले. पत्रकाराला त्यांच्या कर्तव्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.[ads id="ads2"]
ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे सरकारी दस्तऐवज सोबत आपल्या घरी घेऊन जातात असा ग्रामस्थांचा आरोप होता. संबंधित ग्रामसेवक हे अर्धवट ग्रामसभा सोडून निघाले असता ग्रामस्थांनी त्यांची बॅग दाखवा अशी विचारणा केली असता. ग्रामसेवक यांनी सांगितले सदर बागी मध्ये माझे खाजगी कागदपत्रे आहेत. परंतु सदर बॅग ग्रामस्थांनी चेक केली असता. त्या बॅगमध्ये ग्रामपंचायत कोरे उतारे, ग्रामपंचायत चेक बुक, लेटरहेड दलित वस्ती योजनेचे पासबुक, काही खाजगी दुकानांची कोरे बिल हो इतर दस्तऐवज आढळून आले. ग्रामस्थांनी सदर ग्रामपंचायतीचे दस्तऐवज आपण घेऊन जाऊ नये असे सांगत असताना ग्रामसेवक यांनी त्यांची बॅग सोडून तेथुन निघून गेले. सदर घडलेल्या प्रकाराची वरिष्ठ अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ आणि पत्रकार यांच्याकडून केली जात आहे. संबंधित पत्रकार यांनी घोटी पोलीस स्टेशनमध्ये तसा अर्ज केला आहे.