नांदगाव रेल्वे स्थानकावर कुशीनगरसह जनता,कामयानी एक्सप्रेसचे थांबे आठ एप्रिल पासून होणार पूर्ववत

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) : कोरोना काळात नांदगाव येथील रेल्वे स्थानकात काढून घेण्यात आलेल्या जनता गोरखपुर  कुशीनगर आणि कामयानी एक्सप्रेस या तीन गाड्यांना दिनांक आठ मार्च 2013 पासून नांदगाव रेल्वे स्थानकामध्ये पुन्हा थांबे मंजूर करण्यात आले आहे. श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांनी नांदगावकरांना तीन गाड्यांच्या ताब्याची भेट दिल्याने प्रवासी आणि नांदगाव वाशियांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.[ads id="ads1"]  

   कोरोना काळ सुरू झाला असताना नांदगाव रेल्वे स्थानकाच्या वेळापत्रकात एकूण 11 गाड्यांचे थांबे होते. कोरोनाचे वातावरण निवळल्यानंतर रेल्वे गाड्यांची थांबली पुन्हा सुरू करण्यात आले नव्हते. रेल्वे गाडीचे थांबे पूर्वत होत नसल्याने प्रवासी वर्गात मोठा संतोष होता. याबाबत नांदगावकरांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र त्यांना यश येत नव्हते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. [ads id="ads2"]  

  मात्र भुसावळ विभागातील रेल्वे अधिकारी रेल्वे बोर्डला प्रतिकूल अभिप्राय कळवीत नसल्याने काढून घेण्यात आलेले रेल्वे थांबे मंजूर होत नव्हते. अखेर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश आले. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक भूमिका घेत नांदगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनास रेल्वे गाड्यांची थांबे पूर्ववत करण्यासाठी आदेश दिले. रेल्वे बोर्डाचे संयुक्त निर्देशक विवेक कुमार सिन्हा यांनी त्याबाबतची अधिकृत आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार आता नांदगाव रेल्वे स्थानकावर पटना लोकमान्य टिळक, जनता एक्सप्रेस (११२०१/०२), बनारस एक्सप्रेस (११००/  72) , आणि लोकमान्य टिळक गोरखपूर कामायनी एक्सप्रेस (२२५३७/३८) या तीन रेल्वे गाड्यांचे थांबे मंजूर करण्यात आली असून प्रत्यक्षात आठ एप्रिल 2023 पासून तीन एक्सप्रेस गाड्या आता पुरवत नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबणार आहेत.

     केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने नांदगावला एसटीचे तांबे पूर्ववत करण्यात आले आहे. या सेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा.

           नांदगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबे मंजुर करण्यात आले असुन आठ एप्रिल 2023 पासून आता पूर्व थांबणार आहेत.केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने नांदगावला एक्सप्रेसचे तांबे पूर्ववत करण्यात आले आहे. जेसीबीचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा. थांबे मंजूर झाल्याने प्रवासी, विद्यार्थ्यांची गैरसोय आता दूर होणार आहे असे मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी व्यक्त केले.

डॉ. भारती पवार यांच्यासह रेल्वे बोर्डाकडे बोर्डाकडे अनेकदा पाठपुरावा केला असता. आता अकरा रेल्वे गाड्यापैकी आठ थांबे मंजूर झाले असले तरी झेलम रेल्वेगाडीला पूर्ववत थांबा मिळावा तसेच भुसावळ पुणे या गाडीला देखील थांबा देण्यात यावा सौ सुनंदा मुक्ताराम बागुल संविधान आर्मी संघटनेच्या महिला आघाडीच्या नांदगाव तालुकाध्यक्ष यांनी म्हटले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!