धरणगांव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगांव - साळवे हायस्कूलचे आदर्श उपक्रमशिल शिक्षक सुधाकर मोरे यांनी आपल्या आईच्या म्रुत्युपश्च्यात देहदानाचा संकल्प पूर्णकरून चर्मकार समाजात, हिंदू धर्मात व ईतर धर्मात एक क्रांतिकारी निर्णय घेऊन आदर्श निर्माण केला आहे. त्यानिमित्ताने अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या अध्यक्षा डॉ राजकुमारी सुरेश जैन यांनी घरी येऊन सांतवन केले. कौतुक केले आणि प्रमाणपत्र देऊन मोरे दांम्पत्त्याचा सहकुटुंब- सहपरिवार यथोचित सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या, शाबासकी दिली.
समाजात व धर्मात देहदानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आशा व्यक्त केली. आदर्श शिक्षिका कल्पना विसावे,मोरे. ( सून) कौशिक(नातू) संस्कृती (नात) या सर्वाचा सत्कार केला.अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रमिला जी दुसाद यांनी फोनवरून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आणि मेडिकल काँलेज मध्ये शिकणारे डॉक्टर विद्यार्थी म्रुतदेहाची देवासमान विधिवत पूजाअर्चना करून पुढील अभ्यास करायला सुरुवात करतात असे सांगितले.
धरणगाव येथील देहदानाचे प्रचारक पत्रकार विजय शुक्ला यांनी प्रेरणा व मार्गदर्शन केले म्हणून त्यांचाही शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कैलास पवार यांनी भावना व्यक्त केल्या. विनायक कांयदे यांनी फोटोग्राफी केली. पी.डी.पाटील, सुनिल तायडे, श्रीकिसन राठोड आणि डॉ सुरेश जैन ( पारोळा ) हे उपस्थित होते.त्यांनीही शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.