रावेर,निंभोरासह,सावदा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे बोकाळले

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



गांव ठिकाण जागा बदलत शासकीय कार्यालया प्रमाणेच  थाटताय पत्त्यांचे क्लब, सट्टापेढी

अवैध गावठी देशी विदेशी दारुची ढाबे होटलवर विनापरवाना होतेय खुलेआम विक्री 

रावेर प्रतिनिधी/मुबारक तडवी

अवैध धंदे बाबत महाराष्ट्र विधानपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री विद्यमान आमदार तथा गटनेते मा ना.एकनाथरावजी खडसे यांनी जळगांव जिल्ह्यात सुसाट आणि राजरोसपणे खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंदे प्रकरणी आणि पोलिस प्रशासना या अवैध धंदेवाईकांकडे करीत असलेल्या दुर्लक्षाबाबतीत विधानपरिषदेत पोलिस प्रशासनाच्या अकार्यक्षमता कारवाईच्या उदासिनतेबाबत नाराजी व्यक्त करत रावेर तालुक्यातील रावेर, निंभोरा,सावदा हया तीनही पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन नंबरचे धंदे सुरु असल्याची  मध्य प्रदेश सहीत अवैध धंदेवाईकांची नावांची यादीच अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत वाचत  रावेर निंभोरा सावदा शहरासह हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंदे प्रकरणी प्रशासनाला धारेवर धरले होते.[ads id="ads1"]  

   त्यामुळे पोलिस प्रशासनाने कारवाई चा बडगा उगारत अनेक ठिकाणी अवैध धंदेवाईकांवर कारवाई केली काहीक दिवस पत्त्यांचे क्लब सट्टा च्या पिढ्या अवैध बनावट देशी विदेशी विनापरवाना धारक दारुची गुप्ते अड्डे बंद असल्याचा आव दाखवण्यात आला मात्र दामदुप्पट ? देऊन हेच अवैध सट्टा पत्ता विनापरवाना दारुचे अड्डे दैनंदिन गांवे  जागा ठिकाणे बदलवून सुरुच होती व आहेतच  रावेर तालुक्यातील  रावेर निंभोरा सावदा पोलिस स्थानकांच्या हद्दीत पुन्हा निर्धास्तपणे अवैध धंद्यांचा धुमाकूळ सुरू झाला असून रात्रंदिवस जागा ठिकाणे बदलवून शासकीय कार्यालया प्रमाणेच थाटताय पत्तयांचे क्लब सरकारी ऑफिससारखे सुरू आहे सट्ट्यांच्या पिढ्या तसेच अनधिकृत ढाबे होटेल्सवर बेकायदेशीर विनापरवाना अवैध देशी विदेशी दारुची विक्री केली जात आहे.[ads id="ads2"]  

  गावागावात गल्ली बोळात गावाठी किराणा दुकान सारखे दारुची अड्डे सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे या अवैध धंदेवाईकांची नांवे ठिकाण संबंधित रावेर निंभोरा सावदा पोलिस स्थानकाचे प्रभारी अधिकारी बीट पोलिस कर्मचारी यांना माहीत नसतील का??  मग पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करतेय?? कुठे आर्थिक पाणी मुरतेय का??जर नाही तर मंग हे अवैध सट्टा पत्ता बेकायदेशीर विनापरवानगी दारु विक्रेते दोन नंबरचे धंदेवाईकांवर कठोर कारवाई का केली जात नाही?? या अवैध धंद्याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देवून अवैध धंदे कायमचे बंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा : -चार हजाराची लाच भोवली ; रावेर तालुक्यातील "या" गावातील कोतवालासह,तलाठी एसीबीच्या सापळ्यात

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!