रावेर प्रतिनिधी/ मुबारक तडवी
रावेर तालुक्यातील निंभोरा बु येथील घर बांधकाम सुरू असताना धूळ घरात उडाल्याच्या कारणावरून दाम्पत्यासह त्यांच्या मुलांना मारहाण करून शिविगाळ करण्यात आल्याची घटना निंभोरा, ता.रावेर येथे मंगळवारी दुपारी बारा वाजता घडली. या प्रकरणी तिघांविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .[ads id="ads2"]
अनिता विश्वनाथ धनके (48) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या घराचे काम सुरू असून धूळ संशयिताच्या घरात उडाल्याच्या कारणावरून अनिता धनके यांना डोक्यात विटा मारहाण करूण त्यांना गंभीर जखमी केले त्यांनी फिर्यादीसह दोन्ही मुलांसह पतीला शिविगाळ करीत पोटात कमरेत लाथा बुक्या सह विटा मारहाण केली तसेच स्वतःसह मुलगा शुभमला डोक्यात वीट मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा :- रावेर,निंभोरासह,सावदा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे बोकाळले
हेही वाचा : -चार हजाराची लाच भोवली ; रावेर तालुक्यातील "या" गावातील कोतवालासह,तलाठी एसीबीच्या सापळ्यात
या प्रकरणी आरोपी मुरलीधर बळीराम सोनवणे, राजू मुरलीधर सोनवणे, प्रशांत मुरलीधर सोनवणे (सर्व रा.निंभोरा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक राजेंद्र पाटील करीत आहेत.