जेष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांचा आज होणार गौरव

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 जळगाव :- बौद्ध साहित्य प्रसार संस्था , मुंबई तर्फे राज्यातील एका साहित्तिकास दरवर्षी "  जीवन गौरव पुरस्कार " प्रदान करण्यात येतो , या वर्षि या पुरस्कारार्थ जळगाव येथील प्रसिद्ध साहित्तीक व विचारवंत जयसिंग वाघ यांची निवड संस्थे तर्फे करण्यात आली आहे.[ads id="ads1"]  

            जयसिंग वाघ यांची एकूण पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत , विविध वृत्तपत्रात त्यांचे वैचारिक लेखन सुरु आहे , विविध पुस्तकांची समीक्षा प्रसिद्ध झाली असून विविध ठिकाणी सातत्याने भाषणे झाली आहेत.[ads id="ads2"]  

           जयसिंग वाघ यांना सदरचा पुरस्कार 2 एप्रिल रोजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृह , डॉ बाबासाहेब आम्बेडकर मार्केट जवळ , जळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय बौध्द साहित्य संमेलनात उदघाटन समारंभात  मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे , या संमेलनाचे अध्यक्ष डॉ यशवंत मनोहर असून उद्घाटक  रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आम्बेडकर आहेत . 

        साहित्य संमेलना करीता राज्यातुन विविध साहित्तीक येणार असून हे संमेलन 2 व 3 असे दोन दिवस सकाळी ८ ते रात्री ८ पर्यन्त राहणार आहे , यात ३०० प्रतिनिधि सहभागी होणार आहेत तेंव्हा जनतेने मोठ्या संखेने हजर रहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष प्रा भरत शिरसाठ , प्रदेश समन्वयक मुकुंद सपकाळे , डॉ अशोक सैंदाने , धनंजय मोतिराय , विवेक सैंदाने यांनी केले आहे .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!