नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- दिनांक 31 मार्च 2023 रोजी शुक्रवारी पुणे येथील महाराष्ट्र राज्य समाज कल्याण आयुक्त कार्यालयासमोर रिपब्लिक ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या वतीने विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. [ads id="ads1"]
आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, मराठवाडा विभागाचे उपाध्यक्ष उत्तमराव व्हावळे, दिव्यांग आघाडी मराठवाडा अध्यक्ष प्रेमानंद बर्वे, युवा नेते राहुल झडते, वसंत कांबळे, मोहन जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. राज्याची समाज कल्याण आयुक्त श्री प्रशांत नालांवरे यांनी आंदोलनाची गंभीर दखल घेऊन आंदोलन कर्त्यांकची भेट घेऊन तात्काळ कारवाईचे आदेश दिले. व उच्चस्तरीय समिती गठित करण्याचे आश्वासन दिले म्हणून आंदोलन महाराष्ट्र रत्न अनिल भाई गांगुर्डे यांनी धरणे आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.[ads id="ads2"]
. सदर आंदोलनकर्त्यांनी (१) नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयाकडून संस्था बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने वाटप महा घोटाळ्याची उच्चस्तरीय अधिकाऱ्यामार्फत पथकाची नेमणूक करून दोषी आढळणाऱ्यां अधिकारी व संबंधितावर कारवाई करावी, (२)मिनी ट्रॅक्टर एजन्सी (वितरक) यांनी स्वयंसाचा बचत गटांना देण्यात आलेली बिल मधील इंजिन नंबर, चेसिस नंबर, आरटीओ कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या पासिंग सह सर्व संबंधित कागदपत्रांची तपासणी करावी, (३) नांदेड परभणी,हिंगोली या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयातील सण 2012 ते 2023 या कालावधीतील मी डॉक्टर व त्यांची उपसागराने बचत गटांना वाटप करण्यात आलेल्या तसेच कार्यालयात नोंद करण्यात आलेल्या रेकॉर्डची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत अधिकारी व समुद्रावर कारवाई करावी (४) नांदेड,परभणी,हिंगोली या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयातील सन 2012 ते 2023 या कालावधीतील मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने सहसा बचत गटांना वाटप करण्यात आली होती त्या सर्व मिनी ट्रॅक्टरचे जागेच्या मुक्यावर जाऊन पथकामार्फत पाहणी करून ज्या ज्या संस्थाचा बचत गटाकडे देण्यात आलेले मिनी ट्रॅक्टर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी असे या आंदोलनाच्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले असून धरणे आंदोलन करण्यात आले होते



