रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) खानापुर ता. रावेर येथे विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वि जयंती दि.28 रोजी साजरी करण्यात आली. सुरुवातीला त्रिशरण पठण करुन महामानवाच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन संध्याकाळी सहा वाजता मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. [ads id="ads1"]
मिरवणुकीत संविधानाचे पुस्तक व पेन यांचा सुंदर असा देखावा तयार करण्यात करुन बॅड च्या साहाय्याने गावातुन त्यांची मिरवणुक काढण्यात आली . पाढरे शुभ्र वस्त्र घालुन सर्व अनुयायी बाबासाहेबांचा जय जय कार करत मागे चालत होते. मिरवणुकीत सर्व धर्म समभाव च एक वेगळ चित्र ऊभ राहील होत, गावातील प्रत्येक नागरीक मिरवणुकीत सामिल होवुन आनंदाने नाचत होते. रात्री दहा वाजता भिम वंदना करुन मिरवणुकीची सांगता करण्यात आली.[ads id="ads2"]
मिरवणुकीत दत्तुजी मेढे ( भिम आर्मि राष्ट्रिय ऊपाध्यक्ष ) , महेशजी तायडे ( जळगाव जिल्हा संघटक भा.मु मो.) , ईश्वर जाधव ( ब.स.पा ), प्रकाश तायडे ( खानापुर शाखा अध्यक्ष निळे निशाण सामाजिक संघटना)
राहुल निंभोरे ( रावेर ता.अध्यक्ष भिम आर्मी ) विनायक घेटे, मनिष तायडे ,शुभम तायडे ,राहुल तायडे , भास्कर ईंगळे , वामन ईंगळे , प्रदिप तायडे , नागार्जुन तायडे , नितीन तायडे , रुषिकेश सपकाळे, हर्षल तायडे, नमन तायडे ईत्यादिंची ऊपस्थिती होती.



