मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत देवदत्त निकम विजयी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


शुभम वाकचौरे (पुणे जिल्हा प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंधरा जागांपैकी महाविकास आघाडीचे चौदा उमेदवार निवडून आले असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम हे भीमाशंकर शेतकरी पॅनल मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते व ते संचालक पदावर निवडून आले आहे.[ads id="ads1"] 

   या बाजार समितीच्या अठरा जागांसाठी महाविकास आघाडी विरोधात भाजप शिवसेना युतीने पॅनल उभा केला होता मात्र युतीच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे या पूर्वी तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या पंधरा जागांसाठी निवडणूक लागली होती. [ads id="ads2"] 

  बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे  अधिकृत उमेदवार अरुण हगवणे यांचा पराभव केला आहे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवर अनेकांचे लक्ष लागले होते. देवदत्त निकम विजयी झाल्यामुळे अनेक नागरिक त्यांना भेटून शुभेच्छा देत आहे व त्यांच्या या विजयात सहभागी होत आहे.

हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर :  जनधन बँक खाते  असेल तर मिळणार "इतके" रुपये