मुक्ताईनगर ( प्रतिनिधी) येथील आंबेडकरी गीतकार सखाराम हिरोळे यांच्या ' प्रज्ञा सूर्याची तेजस्वी किरणे ' या गीत संग्रहाचे प्रकाशन आ.चंद्रकांत पाटील यांचे हस्ते करण्यात येणार आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून सखाराम हिरोळे हे आंबेडकरी गीते लिहीत आहेत.[ads id="ads1"]
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) येथील प्रतिष्ठित संवाद प्रकाशनने हा गीत संग्रह प्रकाशित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डॉ. रमेश शेवाळे भूषविणार आहेत,तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध लेखक दीपध्वज कोसोदे आणि विख्यात गीतकार सारंग पवार उपस्थित राहतील.[ads id="ads2"]
कार्यक्रम मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी नाट्यगृहात रविवारी दि .१६/०४/२०२३ सकाळी ठीक १०.०० वाजता होईल, उपस्थितीचे आवाहन आयोजकांचे वतीने करण्यात आले आहे.