नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील पिंपरी हवेली येथे माणिकपूर धरणातून गेलेल्या मुख्य कालव्याचे (पाटाचे) काम करण्यात आले असून सदर काम पूर्ण होऊन तब्बल सात ते आठ वर्षाचा कालावधी उलटून गेला असून देखील कुठल्याही प्रकारचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही. काम सुरू करण्यापूर्वी आम्हाला कामासंबंधी अधिकाऱ्यांकडून तात्काळ मोबदला दिला जाईल असे शेतकऱ्यांना तोंडी आश्वासन देण्यात आले होते. कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही तरी सात दिवसाच्या आत मोबाईलला मिळाला नाही तर पाच एप्रिल 2023 पासून उपोषणास बसणार असल्याची माहिती पिंपरी हवेली येथील शेतकऱ्यांनी दिली आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदगाव तालुक्यातील पिंपरी हवेली येथून सण 2015 /2016 मध्ये माणिकपूर धरणातून गेलेल्या मुख्य कालव्याचे (पाटाचे) काम करण्यात आले असून सदर काम पूर्ण होऊन सात ते आठ वर्षाचा कालावधी उलटून गेला. परंतु अजून पर्यंत कुठल्याही प्रकारचा मोबदला पिंपरी हवेली येथील शेतकऱ्यांना मिळालेला नाही. काम सुरू करण्यापूर्वी कामा संबंधित अधिकाऱ्यांकडून तात्काळ मोबाईल दिला जाईल असे तोंडी आश्वासन देण्यात आले. परंतु काम आता पूर्ण होऊन सात ते आठ वर्ष होऊन गेले परंतु कुठलाही मोबदला अजून पर्यंत मिळालेला नाही.[ads id="ads2"]
सदर कामासाठी जिल्हाधिकारी पोर्टलवर 25 नोव्हेंबर 2020 रोजी ऑनलाईन तक्रार देखील केली. काही दिवसानंतर उत्तर आले की मौजे पिंपरी हवेली तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील संपादित केलेल्या एकूण 24 गट बाधित भूधारकांना सदर मोबदला खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने साधा करावा अशी मागणी केली होती. परंतु माणिकपूर प्रकल्पाचा द्वितीय सुप्रमा प्रस्तावास मंजुरी मिळाली नसल्याने भूसंपादन याबाबत पुढील कारवाई होऊ शकली नाही. सदर प्रस्तावास दिनांक 18 डिसेंबर 2018 रोजी तुमच्या जमिनीच्या भूसंपादन प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. तरी पुढील कार्यवाहीसाठी नगररचना विभागाकडे पाठवला आहे. या गोष्टीला तब्बल दोन वर्ष होऊन गेली परंतु अजून काहीही फायदा झाला नाही. त्यानंतर आम्ही सर्व शेतकरी येवला येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाची देखील दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी सदर कामासाठी निवेदन सादर केले. अधिकारी यांच्याकडून तिथेही आम्हाला सांगण्यात आले की, फक्त एक महिना वेळ द्या लवकर तुमचे काम मार्गी लागेल त्यानंतर आता सात महिन्यांचा वेळ निघून गेला अजूनही सांगण्यात येत आहे की अंतिम निवाडा बाकी आहे. साहेबांची सही बाकी आहे. आम्ही किती दिवस विश्वास ठेवायचा आमचे जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी भीक मागायची. तरी आमची सहनशीलता संपली असून आतापासून सात दिवसाच्या आत जर उत्तर मिळाली नाही तर सर्व शेतकरी दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी उपोषणास बसणार असल्याचे निवेदन नांदगावचे तहसीलदार यांना 29 मार्च 2013 रोजी दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे.


