नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील लोकमत महिला सरपंच सौ. मंजुषा गरुड यांनी अपवधीत आपल्या गावात विविध उल्लेखनीय केलेले विकास कामामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील यांनी म्हटले आहे.[ads id="ads2"]
नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच मंजुषा जीवन गरुड यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2023 देऊन गौरविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणार आहे राजश्री पुरस्कार दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी कार्यक्रमात प्रमुख अतिथी आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या शुभहस्ते सकाळी अकरा वाजता माऊली संकुल सभागृह सावेडी रोड अहमदनगर येथे दिला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध भागातून विविध मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.सौ. मंजुषा गरुड यांना पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी अभिनंदन केले असून तसेच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.


