"सण उत्सवाच्या काळात शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होता कामा नये.रूट मार्च द्वारे समाजकंटकांना इशारा-एपीआय जालींदर पळे"
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील येत्या सण,उत्सवच्या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा व कायदा आणि सुव्यवस्था शहरात अबाधित राहावी,या अनुषंगाने गेल्या दोन दिवसांपुर्वी सावदा पोलिस स्टेशनचे सहा,पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील हिंदू-मुसलिम बांधवांच्या मिटींगा घेतल्या,तसेच आज दि.५ एप्रिल रोजी संपुर्ण शहरात पोलीसांसह गृहरक्षक दलाचे जवान सोबत घेऊन जबरदस्त रूट मार्च केला.[ads id="ads1"]
सदरचा रुट मार्च शहरातील शेखपुरा,चाँंदणी चौक,शनी मंदिर,ख्वाजा नगर,जमादार वाडा,संभाजी चौक,गांधी चौक गवत बाजार,बडा आखाडा,शिवाजी चौक,मोठा आड,इंदीरा गांधी चौक,महाविर चौक मार्गे पुन्हा बस स्टेशन येथे रूट मार्च संपविला आहे. [ads id="ads2"]
या रूट मार्च उद्या ६ एप्रिल रोजी सावदा शहरात सालाबादप्रमाणे मरीआईच्या यात्रेनिमित्त बारागाड्याचा उत्सव व हनुमान जयंती मिरवणुकी असून येत्या काही दिवसांत होणारे सण उत्सव शांततेत पार पाळले जावे.सदर काळात कोणत्याही प्रकारची गडबड करण्याचे धाडस समाजकंटका कडून होता कामा नये,जर असे काही गैरकृत्य कोणी केल्यास त्यासाठी पोलीस यंत्रणा पुर्णपणे तयारीत असून सक्षम आहेत निवड हा संदेश देण्याचे उद्देशाने शहरात काढण्यात आला.
हेही वाचा :- शेअर मार्केटच्या नावाखाली रावेर तालुक्यातील उदळी येथील शेतकरी तरुणाला साडे नऊ लाखांचा गंडा
याप्रसंगी शहरातील सर्व नागरिकांना एपीआय जालींदर पळे यांच्याकडून सदरील उत्सवाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.या रुट मार्च मध्ये कर्तव्यदक्ष सहा.पोलीस निरीक्षक जालींदर पळे,फैजपूर पो.स्टे.चे सहा.पो.नि. सिद्धेश्वर आखेगावकर, पीएसआय विनोद खांडबाहाले,ए एसआय महमूद शाहा,अन्वर तडवी,उमेश पाटील गोपनीय विभागाचे पोलीस देवेंद्र पाटील,यशवंत टाहाकळे,सह पोलीस स्टाप आणि गृहरक्षक दलातील महीला व पुरुष जवान सामिल होते.


