यावल (फिरोज तडवी)
यावल तालुक्यातील कोरपावली येथील ग्राप मध्ये विविध विकास कामामध्ये भ्रष्टाचार झाला असून सरपंच आणि ग्रामसेवक यांची चौकशी होऊन ग्रामसेवक यांचा पदभार तात्काळ काढून घेण्यात यावा या मागणीसाठी माजी सरपंच जलील पटेल यांनी आजपासून प.स.यावल येथे उपोषण सुरू केले होते.[ads id="ads1"]
शेवटी प.स.गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांनी सदर भ्रष्टाचाराची चौकशी अधिकारी नेमून योग्य ती चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले व प.स.यावलचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी निळे साहेब, सहाय्यक प्रशासन अधिकारी सरवर तडवी साहेब यांनी व सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीपभैय्या सोनवणे यांच्या हस्ते उसाचा रस पाजून जलील पटेल यांचे उपोषण सोडवण्यात आले.[ads id="ads2"]
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष कदिर खान,कोरपावलीचे उपसरपंच मुक्तार पटेल, ग्राप सदस्य अफरोज पटेल, नईम शेख,अशपाक शाह आदी उपस्थित होते सदर उपोषणाला सकाळपासून अनेक पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य,आदींनी पाठिंबा दिला त्यात प्रामुख्याने प.स चे माजी सदस्य सरफराज तडवी,प.स चे माजी सदस्य आबा ठाकरे, दहीगावचे माजी सरपंच सत्तार तडवी,आर.पी.आय चे युवा जिल्हा सरचिटणीस सुपडू संदानशिव,भीम टायगरचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखेडे, साकळी येथील दलितमित्र मिलिंद जंजाळे,मारुळचे ग्राप सदस्य संजय तायडे,संतोष तायडे,गफ्फार तडवी,अमीर तडवी, राष्ट्रवादीच्या जिल्हाउपाध्यक्षा द्वारकाताई पाटील,अंजाळे येथील पल्लवीताई कोळी,ग्राप सदस्य एकनाथ भालेराव, आकाश अडकमोल, कीनगावचे उपसरपंच शरद अडकमोल, साकळी येथील विलास पवार, नितीन तेली,किसन महाजन, मनू निळे,लखीचंद चौधरी, शब्बीर पटेल,नुरा पटेल,रजाक पटेल,जावेद तडवी,मुबारक तडवी, जयंत अडकमोल,उमेश जावळे, अमर कोळी,तस्लिम पिंजारी, ललित खैरे, शाम ठाकरे,इम्रान पटेल, बोंब घारु,दगडू तडवी,रवींद्र सपकाळे, अशोक भालेराव,दीपक तायडे सह मोठ्या संख्येने अनेकांनी प्रत्यक्ष भेट देऊन आणि भ्रमणध्वनी आणि मेसेज द्वारे पाठिंबा दिला.
हेही वाचा :- शेअर मार्केटच्या नावाखाली रावेर तालुक्यातील उदळी येथील शेतकरी तरुणाला साडे नऊ लाखांचा गंडा


