रावेर तालुका प्रतिनिधी -विनोद हरी कोळी
दिनांक 12/0 4 /2023 या रोजी निंबोल गावा तील स्वस्त धान्य दुकानात रेशनदार प्रत्येक कुटुंबाला शिधा किट वाटप करण्यात आले.
माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे शासनाने गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळीत सुद्धा शिधा किटचे वाटप स्वस्त धान्य दुकानात करण्यात आले. [ads id="ads1"]
तसेच निंबोल येथे गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त शिधा किट वाटप 100 रुपयात एक किट याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर स्वस्त धान्य दुकानात किटचे वाटप करण्यात आले.[ads id="ads2"]
त्या किट मध्ये 1 किलो साखर,1 किलो रवा,1 किलो पाम तल,1 किलो चणा डाळ. अशा चार खाद्यपदार्थ वस्तूंचे वाटप करण्यात आले. निंबोल तालुका रावेर या गावात स्वस्त धान्य दुकानात पहिल्याच दिवशी 50% शिधा किटचे वाटप झाली .पहिल्याच दिवशी चांगल्या प्रकारे लोकांची गर्दी उसळली होती .तसेच, दुसऱ्या दिवशी बऱ्याच प्रमाणात वाटप झाली .शासनाच्या या निर्णयामुळे सर्वत्र नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहेत.